विदेशी रस्त्यावर सायकलिंग करताना जोरात पडला अक्षयकुमार, पहा व्हिडीओ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 22:21 IST2017-08-17T16:50:51+5:302017-08-17T22:21:03+5:30
अक्षयनेच पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये अक्षय सायकलिंग करताना दिसत आहे. मात्र सायकलिंग करताना अचानकच त्याचा तोल जातो अन् तो जोरात खाली पडतो.
.jpg)
विदेशी रस्त्यावर सायकलिंग करताना जोरात पडला अक्षयकुमार, पहा व्हिडीओ !
नुकत्याच रिलीज झालेल्या अक्षयकुमार आणि भूमी पेडनेकरच्या ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटाने शंभर कोेटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविले आहे. असो, आपल्या अक्की पाजीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अक्षयनेच पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये अक्षय सायकलिंग करताना दिसत आहे. मात्र सायकलिंग करताना अचानकच त्याचा तोल जातो अन् तो जोरात खाली पडतो. परंतु चाहत्यांनी काळजी करायची गरज नाही, कारण अक्की पाजी बॉलिवूडचा खिलाडी असून, तो एकदम फिट आहे. खाली पडल्यावर अक्की पूर्णपणे फिट आहे.
या व्हिडीओमध्ये अक्षयकुमार म्हणतोय की, ‘याप्रसंगी मी त्या देशात ज्या देशाकडून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. मी तुम्हाला सांगू शकत नाही की, सध्या मी स्वत:ला किती फ्री फील करीत आहे. जसे मी माझ्या देशात स्वत:ला फ्री समजतो अगदी तसेच इथेही समजत आहे. असो, मित्रांनो तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा’ असे म्हणताच त्याचा सायकलवरून तोल जातो आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतावर जाऊन पडतो.
Coincidentally shooting 2day in the same country v got our freedom from & its sucha liberating feeling,Happy I-Day.Pls don't try this @ home pic.twitter.com/VxGr98AhYa
— Akshay Kumar (@akshaykumar) August 15, 2017
तुम्ही जर असा विचार करीत असाल की, अक्षयकुमार विदेशात काय करीत आहे? तर तो त्याच्या आगामी ‘गोल्ड’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी विदेशात आहे. अक्षयचा हा तोच चित्रपट आहे, ज्यामध्ये तो हॉकी खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयच्या ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास, या चित्रपटाने केवळ सहा दिवसांमध्ये ८९.९५ कोटी रुपयांचा गल्ला जमविला होता. शिवाय ताज्या वृत्तानुसार चित्रपटाने शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविले आहे.