या चित्रपटातील गाण्यासाठी देसी लूकमध्ये शूट करतोय अक्षय कुमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 15:07 IST2018-06-07T09:37:02+5:302018-06-07T15:07:02+5:30
अक्षय कुमार सध्या बॉलिवूड व्यस्त अभिनेत्यांच्या यादीत सगळ्यातवर आहे. एकामागोमाग एक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. केसरीचे शूटिंग संपल्यावर अक्षय ...
.jpg)
या चित्रपटातील गाण्यासाठी देसी लूकमध्ये शूट करतोय अक्षय कुमार
अ ्षय कुमार सध्या बॉलिवूड व्यस्त अभिनेत्यांच्या यादीत सगळ्यातवर आहे. एकामागोमाग एक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. केसरीचे शूटिंग संपल्यावर अक्षय गोल्डच्या शूटिंगला लागला आहे. गोल्डची अधिकतर शूटिंग पूर्ण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अक्षय गोल्ट चित्रपटाचे गाणं शूट करतो आहे. या गाण्यासाठी अक्षयने देसी लूक धारणं केला होता. अक्षय कुर्ता-धोतीमध्ये दिसला. हे गाणं येत्या शुक्रवारपर्यंत पूर्ण केले जाणार असल्याचे समजतेय.
गोल्ड चित्रपटाचे दिग्दर्शन रीमा कागती करते आहे. हा चित्रपट देश स्वतंत्र झाल्यानंतर मिळालेल्या पहिल्या ऑल्पिमिंक गोल्ड मेडलवर आधारित आहे. भारताना 1948 साली हॉकीमध्ये गोल्ड जिंकले होते. काही दिवसांपूर्वी चित्रपटाची शूटिंग लंडनमध्ये सुरू झाली आहे. चित्रपटाच्या सेटवरचे शूटिंग दरम्यानचे काही फोटो व्हायरल झाले होते. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अक्षय कुमार बलबीर सिंग यांची भूमिका साकारतो आहे. भारताला हॉकीमध्ये गोल्ड मेडल मिळले तेव्हा भारतीय हॉकी संघाचे कर्णधर बलबीर सिंग होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑल्पिमिंकमध्ये तीन वेळा गोल्ड मेडल जिंकले आहे. छोट्या पडद्यावरील नागीण फेम मौनी रॉय हि याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करते आहे.
अक्षय कुमारच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर याचवर्षी आलेला पॅडमॅन या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. अक्षयकडे सध्या एकापेक्षा एक चित्रपट आहेत. '2.0', 'हाऊसफुल', 'हेरा फेरी 3' तसेच यशराज राजच्या आगामी चित्रपट तो करिनाच्या अपोझिट असणार आहे. राज मेहता दिग्दर्शित या चित्रपटात करिना कपूर आईच्या भूमिकेत दिसणार आहे. 2009मध्ये आलेल्या कमबख्त इश्क चित्रपटानंतर तब्बल नऊ वर्षांनी हे दोघे एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.