अक्षय कुमारची अग्निपरीक्षा...! फोटो पाहून संतापली पत्नी ट्विंकल; ट्विटरवर घेतला क्लास!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 10:12 AM2019-03-06T10:12:23+5:302019-03-06T10:15:22+5:30

आज अक्षयने आपल्या पहिल्या वेबसीरिजची घोषणा केली. या इव्हेंटमध्ये तो रॅम्पवर उरतला. तो सुद्धा एका धमाकेदार स्टंटसह. होय, अक्षयने आपल्या संपूर्ण शरीराला आग लावली अन् तो रॅम्पवर उतरला.

akshay kumar fire stunt find crap by his wife twinkle khanna |  अक्षय कुमारची अग्निपरीक्षा...! फोटो पाहून संतापली पत्नी ट्विंकल; ट्विटरवर घेतला क्लास!!

 अक्षय कुमारची अग्निपरीक्षा...! फोटो पाहून संतापली पत्नी ट्विंकल; ट्विटरवर घेतला क्लास!!

googlenewsNext
ठळक मुद्दे पापा, तुम्हाला हे करावेच लागेल, असे आरव मला म्हणाला आणि म्हणून मी ही वेबसीरिज करण्याचा निर्णय घेतला, असे अक्षयने यावेळी सांगितले.

जमाना वेब सीरिजचा आहे. वेबच्या जगात येण्यास बडे बडे स्टार उत्सूक आहेत. अशात अक्षय कुमार कसा मागे राहणार. तोही डेब्यू करण्यासाठी आला. अक्षयची पहिली वेब सीरिज अ‍ॅक्शन स्टंटवर आधारित आहे. तूर्तास ‘द एंड’ असे तात्पुरते नाव या वेबसीरिजला देण्यात आले आहे. पण बातमी ही नाही.
आज अक्षयने आपल्या पहिल्या वेबसीरिजची घोषणा केली. या इव्हेंटमध्ये तो रॅम्पवर उरतला. तो सुद्धा एका धमाकेदार स्टंटसह. होय, अक्षयने आपल्या संपूर्ण शरीराला आग लावली अन् तो रॅम्पवर उतरला. अर्थात हे करताना, संपूर्ण काळजी घेण्यात आली होती. आगीमुळे शरीर पोळू नये यासाठी अक्षयच्या शरीरावर लेपही लावण्यात आला होता. पण तरिही अक्षयचा हा स्टंट पाहून अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला.  ट्विंकलची स्थिती तर त्याहूनही खराब झाली.




या स्टंटचे फोटो पाहून ती प्रचंड संतापली. मग काय, तिने लगेच एक ट्विट  करत, हा सगळा मूर्खपणा असल्याचे म्हटले. केवळ इतकेच नाही तर ट्विटरवरचं तिने अक्षयचा क्लास घेतला. मूर्खपणा, हे सगळे मी पाहिले. घरी ये. हे सगळे करून तू जिवंत घरी आलाच तर मीच तुला मारून टाकेल, असे संतापाच्या भरात तिने लिहिले. देवा माझी मदत कर, असे लिहायलाही ती विसरली नाही.




अर्थात  ट्विंकलने हे गमतीत लिहिले होते. पण अक्षयबद्दलची तिची चिंता लपून राहिली नाही.  ट्विंकलच्या या ट्विटवर अक्षयनेही उत्तर दिले. ‘होय, असे काही मी केले. पण खरोखरच मी सुद्धा घाबरलो होतो,’ असे अक्षयने लिहिले.
या वेबसीरिजसाठी मला माझ्या मुलाने प्रोत्साहित केले. तो माझा गुरु आहे. पापा, तुम्हाला हे करावेच लागेल, असे आरव मला म्हणाला आणि म्हणून मी ही वेबसीरिज करण्याचा निर्णय घेतला, असे अक्षयने यावेळी सांगितले.

Web Title: akshay kumar fire stunt find crap by his wife twinkle khanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.