अक्षयकुमारने केला खुलासा; सलमान खानच करणार ‘बिग बॉस’ला होस्ट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 21:36 IST2017-07-29T16:06:09+5:302017-07-29T21:36:09+5:30

रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’चा अकरावा सीजन सुरू असून, अजून बराचसा अवधी आहे. परंतु आतापासूनच त्याबाबतची चर्चा रंगविली जात आहे. ...

Akshay Kumar discloses ban; Salman Khan To Host Big Boss !! | अक्षयकुमारने केला खुलासा; सलमान खानच करणार ‘बिग बॉस’ला होस्ट!!

अक्षयकुमारने केला खुलासा; सलमान खानच करणार ‘बिग बॉस’ला होस्ट!!

अ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’चा अकरावा सीजन सुरू असून, अजून बराचसा अवधी आहे. परंतु आतापासूनच त्याबाबतची चर्चा रंगविली जात आहे. वास्तविक चर्चा काही नवी नाही. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा शो होस्ट कोण करणार? यावरूनच खलबत्ते सुरू आहेत. विशेष म्हणजे ‘सलमानची व्यस्तता’ आणि ‘स्वत:ची इमेज मलीन होऊ नये म्हणून सलमान हा शो सोडणार’ हीच नेहमीची निरर्थक चर्चा घडवून आणली जात आहे. वास्तविक या चर्चेत काही दम नाही, हेही याही वर्षी स्पष्ट झाले आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सलमानची जागा अक्षयकुमार घेणार असल्याच्या चर्चेला अक्षयकुमारनेच पूर्णविराम दिला आहे. अक्षयने याबाबतचा खुलासा करताना म्हटले की, ‘बिग बॉस’चा सीजन-११ सलमान खानच होस्ट करणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अक्षयकुमार बिग बॉसचा ११ वा सीजन होस्ट करणार असल्याची चर्चा घडवून आणली जात होती. मात्र अक्षयनेच या चर्चा निरर्थक ठरविल्या आहेत. एका मुलाखतीत अक्षयने स्पष्ट केले की, ‘बिग बॉस’-११च्या शो मेकर्सनी त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क साधला नाही. सलमान गेल्या सात वर्षांपासून हा शो होस्ट करीत आहे. त्यामुळे मी त्याची जागा घेऊ शकत नाही. अक्षयने याबाबतचा खुलासा त्याच्या आगामी ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान केला. 



वास्तविक सध्या सलमानचे वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. त्याच्या आगामी ‘जिंदा हैं टायगर’ची शूटिंग मोरक्को येथे सुरू असून, अशातही तो भारतात परतला आहे. आता तुम्ही म्हणाल की, सलमान शूटिंग पूर्ण न करताच का परतला? तर त्याचे सोपे उत्तर आहे. सलमानला ‘बिग बॉस’ सीजन ११ चा प्रोमो शूट करायचा आहे. शो मेकर्स ‘बिग बॉस-११’ची थीम काय असेल यावर खूप विचार करीत आहेत. सलमानही त्यासाठी पूर्णपणे तयार आहे. वास्तविक दरवर्षी बिग बॉसचा जोर आॅक्टोंबर महिन्यात सुरू होतो. परंतु यावेळेस निर्माते सप्टेंबरमध्येच प्रोमो रिलीज करून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवू इच्छितात. 

यंंदाच्या सीजनमध्ये ट्विस्ट आणण्यासाठी आणि शोचा टिआरपी वाढविण्यासाठी बिग बॉसच्या निर्मात्यांनी एका चांगल्या थीमवर विचार केला आहे. या थीमनुसार निर्माते एकाच कुटुंबातील दोन सदस्यांना आमनेसामने उभे करणार आहेत. जसे आई-मुलगी, वडील-मुलगा, भाऊ-बहीण. हे दोघे एकमेकांना टक्कर देऊन घरात प्रवेश करतील. अर्थात हा सर्व नॉन स्टॉप तमाशा शोचा टीआरपी वाढविण्यासाठीच असेल. कारण यातून निर्माण होणाºया कॉन्ट्रोव्हर्सीज प्रेक्षकांपर्यंत रंजकपणे दाखविल्या जातील यात शंका नाही. असो, हा सर्व शोचा एक भाग आहे. परंतु होस्टबाबत ज्या निरर्थक चर्चा घडविल्या जात आहेत, त्याची इत्यंभूत माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविणार आहोतच. त्यासाठी दररोज वाचत राहा ‘सीएनएक्स मस्ती’!!

Web Title: Akshay Kumar discloses ban; Salman Khan To Host Big Boss !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.