पुन्हा एकदा एकत्र दिसणार अक्षय कुमार अन् रवीना टंडन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2017 10:53 IST2017-05-30T05:23:18+5:302017-05-30T10:53:18+5:30

अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचे ९० च्या दशकात गाजलेले ‘टिप टिप बरसा पानी...’ हे गाणे तुम्हाला आठवतं असेलच. ...

Akshay Kumar and Raveena Tandon to meet again? | पुन्हा एकदा एकत्र दिसणार अक्षय कुमार अन् रवीना टंडन?

पुन्हा एकदा एकत्र दिसणार अक्षय कुमार अन् रवीना टंडन?

्षय कुमार आणि रवीना टंडन यांचे ९० च्या दशकात गाजलेले ‘टिप टिप बरसा पानी...’ हे गाणे तुम्हाला आठवतं असेलच. अक्षय व रवीनाची जोडी त्यावेळी प्रचंड गाजली होती. आता ही जोडी पुन्हा एकदा पाहण्याचा विचार तुमच्या मनात डोकावला असेल, तर समजा तुमची इच्छा कदाचित खरी होणार आहे. एकेकाळची ही लोकप्रीय आॅनस्क्रीन जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसण्याची शक्यता आहे. अर्थात मोठ्या पडद्यावर नाही तर छोट्या पडद्यावर. होय, सगळी चर्चा यशस्वी झाली तर अक्षय व रवीना दोघेही एक कॉमेडी शो जज करताना दिसू शकतात. चर्चा खरी मानाल तर एका चॅनलने अक्षय व रवीना दोघांनाही एक कॉमेडी शो जज करण्याची आॅफर दिली आहे. हे चॅनल ‘द ग्रेट लाफ्टर चॅलेंज’चे नवे सीझन घेऊन येत आहे. यात अक्षय कुमार सुपरजज म्हणून दिसणार आहे. शोच्या मेकर्सनी रवीनालाही जज बनण्याचा प्रस्ताव दिला आहे. आता रवीनाने होकार दिला वा नाही, हे तूर्तास गुलदस्त्यात आहे. 

ALSO READ : अक्षयकुमार या रिअ‍ॅलिटी शोमधून छोट्या पडद्यावर परतणार!!

पण रवीना अक्षयसोबत हा शो करण्यास होकार देईल, असे तुम्हाला वाटते? आम्ही हा प्रश्न विचारतोय, कारण रवीना व अक्षयचे रिलेशन आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. त्यात बरीच मोठी दरी निर्माण झाली आहे. दोघेही एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. पण नंतर दोघेही वेगळे झालेत. यापश्चात अक्षय कधीही रवीनाबद्दल बोलला नाही. पण रवीना कदाचित अद्यापही भूतकाळ विसरू शकलेली नाही. त्यामुळे रवीना या शोला होकार देईल का? हाच सगळ्यांत महत्त्वाचा प्रश्न आहे. रवीनाने होकार दिलाच तर तिच्या व अक्षय या दोघांच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी असेल.

Web Title: Akshay Kumar and Raveena Tandon to meet again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.