काय म्हणता? बंद झाला अक्षय कुमारचा ‘हा’ धमाकेदार चित्रपट?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 12:14 PM2018-12-11T12:14:49+5:302018-12-11T12:15:47+5:30

होय, अक्षयचा एक मोठा सिनेमा बंद झाला आहे. होय, काही दिवसांपूर्वी अक्षयने आपल्या सोशल अकाऊंटवर या चित्रपटाची घोषणा केली होती.

akshay kumar and neeraj pandey will never start film crack | काय म्हणता? बंद झाला अक्षय कुमारचा ‘हा’ धमाकेदार चित्रपट?

काय म्हणता? बंद झाला अक्षय कुमारचा ‘हा’ धमाकेदार चित्रपट?

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या अक्षयकडे एकापाठोपाठ एक असे ८ सिनेमे आहेत. या चित्रपटांना अक्षयने आधीच तारखा दिल्यात आहे.

बॉलिवूडचा ‘खिलाडी’अक्षय कुमार सध्या जोरात आहे. एकापाठोपाठ एक असे ब्लॉकबस्टर चित्रपट देण्याचा सपाटा त्याने लावलाय. त्याच्या नुकत्याच येऊन गेलेल्या पाच चित्रपटांची बॉक्सआॅफिसवरची आकडेवारी बघितली तर अक्षय बॉलिवूडचा सर्वाधिक यशस्वी स्टार आहे, हे कुणीही मानेल. अलीकडेच रिलीज झालेल्या अक्षयच्या ‘2.0’ने तर आणखीच मोठी झेप घेतली आहे. जगभरात या चित्रपटाने ६०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. पण याचदरम्यान अक्षयच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. होय, अक्षयचा एक मोठा सिनेमा बंद झाला आहे. होय, काही दिवसांपूर्वी अक्षयने आपल्या सोशल अकाऊंटवर  ‘क्रॅक’ या चित्रपटाची घोषणा केली होती. त्याने या चित्रपटाने पोस्टरही रिलीज केले होते. पण यानंतर नीरज पांडे दिग्दर्शित ‘क्रॅक’ रखडला. अद्यापही या चित्रपटावर काम सुरु झालेले नाही. अशात अक्षयने हा चित्रपट सोडल्याची खबर आहे. खबर तर ही सुद्धा आहे की, ‘क्रॅक’ आता कधीच सुरु होणार नाही.


सध्या अक्षयकडे एकापाठोपाठ एक असे ८ सिनेमे आहेत. या चित्रपटांना अक्षयने आधीच तारखा दिल्यात आहे. ‘क्रॅक’च्या घोषणेनंतर आलेल्या त्याच्या चित्रपटांचे शूटींगही सुरु झाले आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षे तरी ‘क्रॅक’ सुरू होणे कठीण दिसत आहे. दोन वर्षांत चित्रपट सुरु होणार नसेल तर तो थंडबस्त्यात पडणे निश्चित मानले जात आहे.
तूर्तास ‘हाऊसफुल 4’, ‘केसरी’, ‘गुड न्यूज’ असे अनेक चित्रपट अक्षयकडे आहेत.२०११ मध्ये रिलीज झालेल्या ‘कंचना- मुनी2’ या तामिळ हॉरर कॉमेडीच्या हिंदी रिमेकमध्ये अक्की झळकणार असल्याचीही खबर आहे.

Web Title: akshay kumar and neeraj pandey will never start film crack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.