अक्षय खन्ना पुन्हा पडद्यावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 16:44 IST2016-06-02T11:14:09+5:302016-06-02T16:44:09+5:30

अभिनेता अक्षय खन्ना पुन्हा रुपेरी पडद्यावर येण्यास सज्ज झालाय. वैयक्तिक कारणास्तव गेल्या अनेक वर्षांपासून अक्षयने बॉलीवूडपासून फारकत घेतली होती. ...

Akshay Khanna again on screen ... | अक्षय खन्ना पुन्हा पडद्यावर...

अक्षय खन्ना पुन्हा पडद्यावर...

िनेता अक्षय खन्ना पुन्हा रुपेरी पडद्यावर येण्यास सज्ज झालाय. वैयक्तिक कारणास्तव गेल्या अनेक वर्षांपासून अक्षयने बॉलीवूडपासून फारकत घेतली होती. २०१२ साली ‘गली गली चोर है’ नंतर आता तो ‘ढिशूम’च्या माध्यमातून परत येतोय. जॉन अब्राहम आणि वरुण धवन या चित्रपटात काम करीत आहेत. 
‘मी काही वैयक्तिक कारणास्तव बाजूला गेलो होतो. आता ढिशूमच्या माध्यमातून परत येण्यास उत्सुक आहे. या वर्षी माझे आणखी दोन चित्रपट येतील, अशी अपेक्षा अक्षयने व्यक्त केली आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना वाघा नावाची भूमिका करीत आहे. जो भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यापूर्वी प्रसिद्ध क्रिकेटपटूचे अपहरण करतो. केवळ एका अक्षराच्या कथेने त्याने या चित्रपटात काम केले. ‘ हा अत्यंत फ्रेश विषय होता. भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी ३६ तास अगोदर भारताच्या प्रमुख क्रिकेटपटूचे अपहरण होते.’ या विषयामुळे या चित्रपटात काम केले. 
अक्षयने यापूर्वी बॉर्डर, ताल, रेस या चित्रपटात काम केले आहे. माध्यमांना घाबरणाºया अक्षयला अनेक वर्षानंतर माध्यमांशी बोलताना कसे वाटले असे विचारले असता तो म्हणाला, मी नेहमीच माध्यमांना घाबरतो. यात नवीन काही नाही.’ 
ढिशूम २९ जुलै रोजी प्रदर्शित होतो आहे.

Web Title: Akshay Khanna again on screen ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.