​अक्षयने मागितली ‘फॅन’ची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2016 23:59 IST2016-04-30T18:29:51+5:302016-04-30T23:59:51+5:30

फिल्म सेलिब्रेटींजना भेटण्याची, आॅटोग्राफ किंवा त्यांच्यासोबत फोटो काढण्याची चाहत्यांची इच्छा असते. परंतु अनेकवेळा असे करत असताना चाहत्यांना वाईट अनुभवांना ...

Akshay asked for forgiveness of the fan | ​अक्षयने मागितली ‘फॅन’ची माफी

​अक्षयने मागितली ‘फॅन’ची माफी

ल्म सेलिब्रेटींजना भेटण्याची, आॅटोग्राफ किंवा त्यांच्यासोबत फोटो काढण्याची चाहत्यांची इच्छा असते. परंतु अनेकवेळा असे करत असताना चाहत्यांना वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते.

गुरुवारी मुंबई विमानतळावर अक्षयच्या बॉडीगार्डने एका चहत्याला ठोसा मारल्याची घटना घडली. अक्षयला जेव्हा हे कळाले तेव्हा त्याने त्वरीत माफीनाफा प्रसिद्ध करून चाहत्याची जाहीर माफी मागितली. आपल्या चाहत्याला अशी वागणूक दिली जाते म्हटल्यावर अक्षयला राहवले नाही.

तो म्हणतो, त्यादिवशी घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैैवी होता. त्या चाहत्याची मी मनापासून माफी मागतो. मला हे माहित नव्हते की माझ्या बॉडीगार्डने त्या चाहत्याला मारहाण केली. नंतर कळाल्यावर मी बॉडीगार्डला याबाबत चांगलेच खडसावले. प्रत्येक चाहता माझ्यासाठी खूप प्रिय आणि महत्त्वाचा आहे. यापुढे असे घडणार नाही याची सक्त ताकीद सर्व बॉडीगार्डस्ना मी दिली आहे. 

वेल डन अक्की!!

Web Title: Akshay asked for forgiveness of the fan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.