अक्कीच्या बॉडीगार्डचा मथुरेत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 10:58 IST2016-12-14T10:58:59+5:302016-12-14T10:58:59+5:30

बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार याचा बॉडीगार्ड मनोज शर्माचा काल मथुरा जंक्शन येथे रेल्वेतून उतरताना मृत्यू झाला. मथुरेच्या प्लॅटफॉर्म नंबर ...

Akki bodyguard dies in Mathura | अक्कीच्या बॉडीगार्डचा मथुरेत मृत्यू

अक्कीच्या बॉडीगार्डचा मथुरेत मृत्यू

लिवूडचा अभिनेता अक्षय कुमार याचा बॉडीगार्ड मनोज शर्माचा काल मथुरा जंक्शन येथे रेल्वेतून उतरताना मृत्यू झाला. मथुरेच्या प्लॅटफॉर्म नंबर दोन वरून तो उतरत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो रेल्वेच्या खाली गेला. त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. जागेवरच त्याचा झालेला मृत्यू पाहून रेल्वेस्टेशनवरील सर्व प्रवाशांचा अक्षरश: थरकाप उडाला. स्थानिक प्रवाशांच्या सूचनेनुसार, तिथे काही क्षणातच जीआरपी (गर्व्हनमेंट रेल्वे पोलीस) आणि आरपीएफ (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स)चे पथक पोहोचले. मृत घोषित केल्यानंतर पोलिसांनी ते शव पोस्टमार्टमसाठी पाठवले. 

तो कुठून येत होता? मुळचा तो राहणारा कुठला? असे अनेक प्रश्न तेथील प्रवाशांना पडले. त्याच्यासंदर्भात पुढे झालेल्या चौकशीतून कळाले की, ‘ तो मुळ ‘नगला कली इंद्री आग्रा’ येथील रहिवासी असून मथुरेतील बरसाना येथे अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी आला होता. दोन दिवसांच्या सुट्ट्या घेऊन तो आग्रा येथील त्याच्या घरी जात होता. कर्नाटक एक्सप्रेसमधून जात असताना झालेली ही घटना अतिशय दु:खद होती. कुटुंबियांना त्याच्या मृत्यूविषयी कळताच घरी दु:खाचा डोंगर कोसळला. 

अक्षय कुमार हा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ ची शूटिंग करण्यात व्यस्त असून भूमी पेडणेकर त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘जॉली एलएलबी २’ चित्रपटाचेही शूटिंग सुरू असून ‘शबाना’ मध्येही तो पाहूण्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, त्याचा अतिशय जवळचा आणि विश्वासू बॉडीगार्डच्या मृत्यूविषयी त्याने दु:ख व्यक्त केले आहे. 

Web Title: Akki bodyguard dies in Mathura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.