जे कुणी नाही केले ते अजीत कुमारने करून दाखवले!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 12:09 PM2019-02-04T12:09:09+5:302019-02-04T12:11:08+5:30

तामिळ सुपरस्टार अजीत कुमार चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहेत. केवळ साऊथ इंडस्ट्रीतचं नाही तर जगभर त्याचे चाहते आहेत. म्हणून त्याचे चित्रपट जगभर बक्कळ कमाई करतात. आता अजीतच्या नावावर एक नवा विक्रम नोंदवला गेला आहे.

ajith kumar creates history becomes the only actor in the last 50 years to achieve this | जे कुणी नाही केले ते अजीत कुमारने करून दाखवले!!

जे कुणी नाही केले ते अजीत कुमारने करून दाखवले!!

googlenewsNext
ठळक मुद्दे यावर्षांत येऊ घातलेल्या ‘पिंक’च्या तामिळ रिमेकमध्ये अजित दिसणार आहे. अमिताभ यांची भूमिका तो साकारणार आहे.

तामिळ सुपरस्टार अजीत कुमार चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहेत. केवळ साऊथ इंडस्ट्रीतचं नाही तर जगभर त्याचे चाहते आहेत. म्हणून त्याचे चित्रपट जगभर बक्कळ कमाई करतात. आता अजीतच्या नावावर एक नवा विक्रम नोंदवला गेला आहे. होय, असा विक्रम जो आजपर्यंत अनेक दिग्गजांना बनवता आला नाही. होय, आत्तापर्यंत कुठलाही चित्रपट कन्नडमध्ये डब करायचा म्हटले की, अनंत अडचणींचा सामना करावा लागायचा. पण अजीतच्या चार चित्रपटांनी हा कारनामा करून दाखवला. गत ५० वर्षांत असे पहिल्यांदा झाले.


सन २०१७ मध्ये त्याच्या ‘विवेगम’ या चित्रपटाला ‘कमांडो’ या नावाने कन्नडमध्ये रिलीज केले गेले. ५० वर्षांत पहिल्यांदा कुठला चित्रपट कन्नडमध्ये डब केला गेला होता. गेल्या अनेक वर्षांत हिंदी, इंग्रजी, तामिळ आणि तेलगू चित्रपट कर्नाटकमध्ये रिलीज झालेत. मात्र यापैकी कुठलाही चित्रपट कन्नडमध्ये रिलीज झाला नाही. अगदी साऊथचा सर्वात मोठा चित्रपट ‘बाहुबली’ सुद्धा कन्नडमध्ये रिलीज होऊ शकला नव्हता. अजितने मात्र हे अगदी सहजपणे करून दाखवले आणि हे करणारा नव्या पिढीतील पहिला अभिनेता बनला. ‘कमांडो’शिवाय अजितचे ‘सत्यादेव’ आणि ‘धीरा’ हे दोन चित्रपटही कन्नडमध्ये डब करण्यात आले आहेत. आता त्याचा ‘विश्वासम’ हा चित्रपटही ‘जगा मल्ला’ नावाने कन्नडमध्ये रिलीज होत आहे.


१९९० मध्ये अजितने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली होती. यावर्षांत येऊ घातलेल्या ‘पिंक’च्या तामिळ रिमेकमध्ये अजित दिसणार आहे. अमिताभ यांची भूमिका तो साकारणार आहे.

Web Title: ajith kumar creates history becomes the only actor in the last 50 years to achieve this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.