अजय देवगणच्या 'तानाजी'मध्ये 'या' तेलगु सुपरस्टरची एंट्री !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 02:24 PM2018-09-04T14:24:03+5:302018-09-04T14:31:24+5:30

अजय देवगण सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’चे शूटिंग सुरु केले आहे. अजयने या सिनेमासाठी खूप तयारी केली आहे.

Ajay Devgn's 'Tanaji' entry in 'Telugu superstar'! | अजय देवगणच्या 'तानाजी'मध्ये 'या' तेलगु सुपरस्टरची एंट्री !

अजय देवगणच्या 'तानाजी'मध्ये 'या' तेलगु सुपरस्टरची एंट्री !

googlenewsNext
ठळक मुद्दे अजय देवगण यात तानाजींच्या भूमिकेत दिसणार आहेयासिनेमाचे दिग्दर्शन ओम राऊत करतोयया सिनेमाचे बजेच जवळपास १५० कोटींचे आहे.

अजय देवगण सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’चे शूटिंग सुरु केले आहे. अजयने या सिनेमासाठी खूप तयारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजयसोबत या सिनेमात सैफ अली खानचे देखील नाव कन्फर्म करण्यात आले होते. मात्र त्याच आता तेलुगु सुपरस्टार जगपती बाबूला कन्फर्म करण्यात आले आहे. मुंबईतल्या स्टुडिओमध्ये तानाजीचे शूटिंग सुरु आहे त्याठिकाणी जगपती बाबू स्पॉट झाला आहे. या सिनेमात तो नेमकी कोणती भूमिका साकारणार आहे याबाबतची माहिती अजून मिळू शकलेली नाही.  


बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार अजय देवगण या सिनेमाचे शूटिंग ऑक्टोबरपासून सुरु करणार आहे. यासिनेमाचे दिग्दर्शन ओम राऊत करतोय. अजय देवगण यात तानाजींच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे बजेच जवळपास १५० कोटींचे आहे. यातील सर्वाधिक खर्च वीएफएक्सवर करण्यात येणार आहे. 

अजयला तानाजीच्या भूमिकेत पाहणे, चाहत्यांसाठी कुठल्या भेटीपेक्षा कमी नसणार आहे. यात अजय एकदम वेगळ्या अवतारात दिसेल. अजय दीर्घकाळापासून या प्रोजेक्टवर काम करत होता. स्वत: अजय या चित्रपटाबद्दल कमालीचा उत्सूक आहे. कोंढाणा जिंकूण आणण्यासाठी तानाजींनी प्राणांची बाजी लावली होती. तानाजी हे बारा हजार हशमांचे (पायदळ) सुभेदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या काही सहकाºयांनीदेखील शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य मिळवण्यासाठी लढण्याची शपथ घेतली होती. तानाजी हे शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकाºयांपैकी एक होते. 

Web Title: Ajay Devgn's 'Tanaji' entry in 'Telugu superstar'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.