अजय देवगण आणि काजल करणार पुन्हा एकदा रोमांस !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 13:37 IST2017-08-30T08:06:46+5:302017-08-30T13:37:33+5:30
अजय देवगण आणि काजल बॉलिवूडमधल्या टॉप कपल पैकी एक आहे. काजल आणि अजयच्या फॅन्स त्यांना स्क्रीनवर एकत्र बघण्यासाठी गेल्या ...

अजय देवगण आणि काजल करणार पुन्हा एकदा रोमांस !
हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे. ज्यात अजय आणि काजल एकमेकांसोबत रोमांस करताना दिसणार आहेत. प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून याला घेऊन संभ्रमात होते की नक्की हे दोघे याच चित्रपटात एकत्र काम करणार आहेत की नाही. डीएनए या वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार हा एक फॅमिली चित्रपट असणार आहे. हा एक एंटरटेंनिग चित्रपट असणार हा ज्यात प्रेक्षकांसाठी एक सोशल मेसेजसुद्धा देण्यात येणार आहे. इश्क आणि प्यार तो होना ही था सारख्या कॉमेडी चित्रपटांमध्ये अजय आणि काजलनी याआधी ही एकत्र काम केले आहे. राजू चाचा, टुनपूर, सुपरहिरो आणि दिल क्या करे याचित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र स्क्रिनदेखील शेअर केली आहे. या शुक्रवारी अजयचा आगामी चित्रपट बादशाहो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अजयशिवाय इलियाना डिक्रूझ, इम्रान हाश्मी आणि ईशा गुप्ता यांच्या मुख्य भूमिका आहेत. तसेच दिवाळीत अजय देवगण स्टारर गोलमाल अगेनसुद्धा रिलीज होणार आहे.