अजयला भोवली पान मसाल्याची जाहिरात...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 06:21 IST2016-03-11T13:21:50+5:302016-03-11T06:21:50+5:30
पान मसाल्याची जाहिरात करणे अजय देवगनला महाग पडण्याची चिन्हे आहेत. दिल्ली सरकारने याप्रकरणी त्याला नोटीस बजावले आहे. सिगारेट आणि ...
.jpg)
अजयला भोवली पान मसाल्याची जाहिरात...!
प न मसाल्याची जाहिरात करणे अजय देवगनला महाग पडण्याची चिन्हे आहेत. दिल्ली सरकारने याप्रकरणी त्याला नोटीस बजावले आहे. सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायदा २००३ च्या कलम ५ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली. गुटखा, तंबाखू व तत्सम पदार्थाच्या जाहिरातील अभिनेत्यांची उपस्थितीतून समाजात चुकीचा संदेश जातो. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानीकारक असल्याने समाजहिताच्यादृष्टीने अशा जाहिराती करणे थांबवावे,असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.