​ऐश्वर्या रायचे वडील आजारी : दोन आठवड्यांपासून सुरू आहेत उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2017 21:21 IST2017-01-28T15:51:06+5:302017-01-28T21:21:06+5:30

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचे वडील कृष्णाराज राय आजारी असल्याने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे, मागील दोन ...

Aishwarya Rai's father is sick: he has started treatment for two weeks | ​ऐश्वर्या रायचे वडील आजारी : दोन आठवड्यांपासून सुरू आहेत उपचार

​ऐश्वर्या रायचे वडील आजारी : दोन आठवड्यांपासून सुरू आहेत उपचार

लिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचे वडील कृष्णाराज राय आजारी असल्याने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे, मागील दोन आठवड्यांपासून ते आजारी असल्याचे सांगण्यात येते आहे. ऐश्वर्या व तिची आई सध्या हॉस्पिटलमध्ये त्यांची देखभाल करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. वडिलांच्या आजारपणामुळेच ऐश्वर्याने न्यू इअर व्हॅकेशन अर्ध्यावर सोडले होते, असेही सांगण्यात येत आहे. 

एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, न्यू इअर व्हॅकेशनसाठी ऐश्वर्या आपल्या कुटुंबासोबत दुबईला गेली होती. येथेच तिला वडिलांची प्रकृती ठिक नसल्याची माहिती मिळाली. यामुळे तिना आपला हा टूर रद्द के ला. ती तडलाफडकी मुंबईला परत आली होती. मात्र ऐश्वर्याचे वडील कृष्णाराज यांना कोणता आजार झाला आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मागील दोन आठवड्यांपासून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. वडिलांच्या देखभालीसाठी ऐश्वर्या आपला जास्तीत जास्त वेळ हॉस्पिटलमध्ये घालवित आहे अशीही माहिती मिळतेय. अभिषेक बच्चन आपल्या कामानिमित्त न्यूयार्क येथे गेला होता, मात्र त्याने आपले का आटोपले असून तो देखील आपल्या सासºयांच्या तब्येतीची काळजी घेत आहे. 



नुकतेच ऐश्वर्याला मुलगी आराध्याच्या स्पोटर्स डेच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी पाहण्यात आले होते. त्यावेळी देखील ती आपल्या वडिलांच्या संपर्कात होती. ऐश्वर्याचे वडील पेशाने मरीन इंजिनीअर असून आता ते सेवानिवृत्त झाले आहेत. ऐश्वर्याच्या जन्मानंतर काही वर्षांनी कृष्णाराज मुंबईला शिफ्ट झाले होते. ऐश्वर्याचा मोठा भाऊ आदित्य देखील आपल्या वडीलांची काळजी घेतो आहे. ऐश्वर्याची आई वृंदा राय लेखिला आहेत. 

Web Title: Aishwarya Rai's father is sick: he has started treatment for two weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.