​अभिषेक बच्चनच्या करियरचा ग्राफ उंचवण्यासाठी ऐश्वर्या राय घेतेय सलमान खानशी संबंधित या व्यक्तीची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 11:20 IST2017-12-22T05:50:12+5:302017-12-22T11:20:12+5:30

अमिताभ बच्चन यांना सदीचा महानायक असे म्हटले जाते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आजही ते छोट्या ...

Aishwarya Rai is taking care of Abhishek Bachchan's career graph, help this person related to Salman Khan | ​अभिषेक बच्चनच्या करियरचा ग्राफ उंचवण्यासाठी ऐश्वर्या राय घेतेय सलमान खानशी संबंधित या व्यक्तीची मदत

​अभिषेक बच्चनच्या करियरचा ग्राफ उंचवण्यासाठी ऐश्वर्या राय घेतेय सलमान खानशी संबंधित या व्यक्तीची मदत

िताभ बच्चन यांना सदीचा महानायक असे म्हटले जाते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आजही ते छोट्या पडद्यावर, मोठ्या पडद्यावर काम करताना दिसत आहे. त्यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाला तर प्रेक्षकांची चांगलाच पसंती मिळाली आहे. पण त्यांच्या इतके यश त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनला मिळवता आले नाही. अभिषेकने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला काही हिट चित्रपट दिले होते. पण गेल्या काही वर्षांपासून त्याच्या करियरचा ग्राफ ढासाळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचा करियरचा ग्राफ उंचवण्याचे आता त्याची पत्नी ऐश्वर्या रायने ठरवले आहे. ऐश्वर्या यासाठी तिचा पूर्वप्रियकर सलमान खानच्या संबंधित एका व्यक्तीची मदत घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
रेश्मा शेट्टी ही सलमान खानची अनेक वर्षं मॅनेजर होती. पण नऊ वर्षांनंतर त्या दोघांमध्ये काही वादविवाद झाले आणि सलमानने त्याची मॅनेजर बदलली. सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये रेश्मा हस्तक्षेप करत असल्याचे म्हटले जात होते. एवढेच नव्हे तर सलमान खानचा भाऊ सोहेल खान याच्या कार्यक्रमास सलमानने हजेरी लावू नये असे तिने सलमानला सांगितले होते. त्यामुळेच सलमानने हा निर्णय घेतला होता. सलमाननंतर रेश्मा अक्षय कुमारसोबत काम करत होती आणि आता अभिषेकच्या करियर सांभाळण्यासाठी ऐश्वर्याने रेश्माची निवड केली आहे अशी जोरदार चर्चा रंगली आहे.
अभिषेक सध्या त्याच्या करियरच्या बाबतीत खूपच सर्तक आहे. त्यामुळे तो चित्रपट अतिशय चोखंदळपणे निवडत आहे. संजय लीला भन्साळी पद्मावती या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्यांच्या नव्या चित्रपटावर काम करायला सुरुवात करणार आहे. संजयचा हा नवा चित्रपट प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानावी यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. साहिर यांना प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. या चित्रपटात अभिषेक प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिषेकच्या करियरसाठी हा चित्रपट अतिशय महत्त्वाचा असणार आहे. अभिषेकच्या करियरला एक टर्निंग पॉईंट देण्यासाठी ऐश्वर्या रेश्माची मदत घेणार असल्याचे म्हटले जात आहे.  

Also Read : आराध्या झाली ट्रोल! युजरच्या प्रश्नाने भडकला अभिषेक बच्चन !!

Web Title: Aishwarya Rai is taking care of Abhishek Bachchan's career graph, help this person related to Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.