#Mee Too कॅम्पेनवर बोलली ऐश्वर्या राय; मॅनेजरने हार्वे विंस्टीनपासून ऐश्वर्याचा केला होता बचाव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 22:18 IST2018-03-27T16:48:03+5:302018-03-27T22:18:03+5:30
हॉलिवूडसह बॉलिवूडमधील बºयाचशा अभिनेत्री #Mee Too या कॅम्पेनअंतर्गत आपल्याशी झालेल्या सेक्शुअल हॅरेमेंटचा जाहीरपणे खुलासा करीत आहेत. आता बॉलिवूडचा सर्वांत ...

#Mee Too कॅम्पेनवर बोलली ऐश्वर्या राय; मॅनेजरने हार्वे विंस्टीनपासून ऐश्वर्याचा केला होता बचाव!
ह लिवूडसह बॉलिवूडमधील बºयाचशा अभिनेत्री #Mee Too या कॅम्पेनअंतर्गत आपल्याशी झालेल्या सेक्शुअल हॅरेमेंटचा जाहीरपणे खुलासा करीत आहेत. आता बॉलिवूडचा सर्वांत आघाडीची अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हीदेखील या कॅम्पेनच्या सपोर्टसाठी पुढे आली आहे. नुकतीच एका ब्रॅण्डच्या डीलसाठी सिडनी येथे पोहोचलेल्या ऐश्वर्याने सांगितले की, एक बाब चांगली घडत आहे ती म्हणजे लोक याविषयी बिंधास्तपणे बोलण्यासाठी पुढे येत आहेत. मला नाही वाटत की, हा मुद्दा एवढ्या लवकरच संपेल. काही महिन्यांपूर्वीच ऐश्वर्याचे मॅनेजर सिमोन फील्डने सांगितले होते की, हॉलिवूड निर्माता हार्वे विंस्टीन कशा पद्धतीने त्याच्या क्लाइंटशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करतो.
ऐश्वर्याचे टॅलेंट मॅनेजर सिमोनच्या मते, हार्वेला एकांतात ऐश्वर्याला भेटायचे होते. परंतु त्याला ही संधी कधीच मिळाली नाही. शिमोनच्या मते, मी भारतीय अभिनेत्री ऐश्वर्या रायचा मॅनेजर होतो. हार्वेसोबत डील करताना माझ्या लक्षात आले की, त्याला ऐश्वर्याची एकांतात भेट घ्यायची होती. याबद्दल त्याने मला बºयाचदा विचारणाही केली. परंतु मी त्याची ही मागणी फार गंभीरपणे घेतली नाही. ऐवढेच काय तर जेव्हा मी त्याच्या आॅफिसमधून बाहेर येत होतो, तेव्हा त्याने मला पुन्हा म्हटले की, मला तिला (ऐश्वर्या) एकांतात भेटण्यासाठी काय करावे लागेल? जेव्हा मी त्याचे ऐकत नसल्याचे त्याला समजले तेव्हा त्याने मला धमकाविण्याचा प्रयत्न केला, असेही सिमोनने म्हटले.
![]()
पुढे बोलताना सिमोनने म्हटले की, मीदेखील त्याला उत्तर देताना म्हटले की मलादेखील तुझ्यासारख्या क्लाइंटसोबत काम करण्याची इच्छा नाही. रिपोर्टसनुसार, हार्वे नेहमीच हॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल्सला हॉटेलमध्ये बोलावित असे. शिवाय त्यांच्यासोबत छेडछाड करण्यापर्यंत त्याची मजल जात असे. त्यामुळेच अॅँजेलिना जोलीसह अनेक बड्या अभिनेत्रींनी त्याच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले. हॉलिवूडमधील अॅँजेलिना जोली, ग्वेनेथ पेल्ट्रो यांच्यासह १३ बड्या अभिनेत्रींनी हार्वेविरोधात एल्गार पुकारला आहे.