​कान्समध्ये ऐश्वर्या राय बच्चनचा हा असेल अजेंडा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2017 16:23 IST2017-05-19T10:53:03+5:302017-05-19T16:23:03+5:30

ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा कान्समध्ये पोहोचली आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर उतरण्यास ऐश्वर्या सज्ज झाली आहे. तेही एका अजेंड्यासह. ...

Aishwarya Rai Bachchan's Agenda !! | ​कान्समध्ये ऐश्वर्या राय बच्चनचा हा असेल अजेंडा!!

​कान्समध्ये ऐश्वर्या राय बच्चनचा हा असेल अजेंडा!!

्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा कान्समध्ये पोहोचली आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर उतरण्यास ऐश्वर्या सज्ज झाली आहे. तेही एका अजेंड्यासह. तिचा हा अजेंडा जाणून याठिकाणचे तिचे चाहतेही नक्कीच आनंदी होतील. होय, कान्समध्ये तुझा अपिअरन्स कसा असेल, असे ऐश्वर्याला विचारले गेले. त्यावर ऐश जे काही बोलली त्यावरून तरी तसेच वाटते. आशा आहे, तुम्हाला मज्जा येईल आणि मलाही माझ्या शुभचिंतकांशी भेटून आनंद होईल, असे ऐश्वर्या म्हणाली. एकंदर काय तर चाहत्यांना ऐश्वर्याला पाहून आनंद होईल, असाचा काल्समध्ये तिचा अपिअरन्स राहिल, असे ऐश्वर्याला यातून सांगायाचे आहे.





ऐश्वर्या कान्समध्ये ‘देवदास’च्या स्क्रिनिंगला हजेरी लावेल.भरतचंद्र चटोपाध्याय यांच्या १९०१ मध्ये आलेल्या नॉवेलवर आधारित ‘देवदास’ या चित्रपटात शाहरूख खान देवदासच्या भूमिकेत दिसला होता. तर ऐश्वर्या पारो आणि माधुरी दीक्षित चंद्रमुखीच्या भूमिकेत होती.  तूर्तास ऐश्वर्याचा रेड कार्पेट लूक पाहण्यासाठी सगळे जण आसुसलेले आहेत. ऐश्वर्या कुठ्ल्या स्टाईलमध्ये रेड कार्पेटवर उतरते, ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.  ऐश्वर्या एका इंटरनॅशनल ब्रँडची जुळलेली आहे. या ब्रँडची ती ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. याच नात्याने या ब्रँडच्या वतीने ऐश्वर्या यंदाही कान्स सोहळ्यात आपली उपस्थिती नोंदवणार आहे. गतवर्षीप्रमाणे यंदा या सोहळ्यात ऐश्वर्यासोबत सोनम कपूर सुद्धा कान्सच्या रेड कार्पेटवर उतरणार आहे.  गतवर्षी ऐश्वर्या राय बच्चन पर्पल लिपस्टिक लावून कान्सच्या रेड कार्पेटवर दिसली होती. यामुळे तिला बºयाच टिकेला सामोरे जावे लागले होते. याऊलट सोनम कपूरने तिच्या आगळ्या-वेगळ्या फॅशन स्टाईलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.  

Web Title: Aishwarya Rai Bachchan's Agenda !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.