ऐश्वर्या राय बच्चन सलमान खानसोबत दिसणार होती 'या' चित्रपटात, मात्र ऐशने दिला नकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 11:13 IST2018-04-03T05:43:53+5:302018-04-03T11:13:53+5:30

ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान यांच्यातले नातं सगळ्यांच माहिती आहे. संजय लीला भन्साळींच्या 'हम दिल दे चुके सनम' ...

Aishwarya Rai Bachchan would be seen with Salman Khan in the film, but Ash refused! | ऐश्वर्या राय बच्चन सलमान खानसोबत दिसणार होती 'या' चित्रपटात, मात्र ऐशने दिला नकार!

ऐश्वर्या राय बच्चन सलमान खानसोबत दिसणार होती 'या' चित्रपटात, मात्र ऐशने दिला नकार!

्वर्या राय बच्चन आणि सलमान खान यांच्यातले नातं सगळ्यांच माहिती आहे. संजय लीला भन्साळींच्या 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. तसेच दोघे 'हम तुम्हारे है सनम'मध्ये छोट्याशा भूमिकेत दिसले होते. याशिवाय आणखीन एका चित्रपटात दोघे एकत्र दिसणार होते मात्र ऐश्वर्या रायने तो चित्रपट करण्यास नकार दिला. 

ऐश्वर्या आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या होत्या. दिल तो पागल है, कुछ कुछ होता है आणि मन सारख्या चित्रपटांसाठी ऑफरची निवड झाली होती मात्र तिने त्याला नकार दिला ऐवढेच नाही तर सूरज बडजात्या यांच्या हम साथ साथ चित्रपटात काम करण्यासदेखील तिने नकार दिला होता. यात तिची जोडी सलमान खानसोबत जमणार होती.  
रिपोर्टच्यानुसार सूरज ऐश्वर्याला याचित्रपटात लीड अभिनेत्री म्हणून साईन करणार होते. डेट्स नसल्यामुळे ऐशने चित्रपट नाकारला. नुकत्याच एका इंटरव्हु दरम्यान ती म्हणाली, मला या चित्रपटात काम करणं शक्य नव्हते. सूरज यांनी माझी अडचण समजून घेतली आणि त्यांनी माझ्या प्रफेशनलिजमचे कौतूक देखील केले. 


ALSO READ :  कौटुंबिक आयुष्याबद्दल पहिल्यांदाच बिंधास्त बोलली ऐश्वर्या राय-बच्चन!

१९९९ मध्ये संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात ऐश्वर्या आणि सलमानच्या जोडीने सर्वांनाच वेड लावले होते. या चित्रपटाच्या सेटवर त्यांचे प्रेम फुलले. पडद्यावरील जोडीचे आणि पडद्यानमागील जोडीचे सुद्धा सर्वांनी कौतुक केले. पण काही कारणास्तव हे नातं फार वेळ टिकले नाही. २०१८च्या सुरूवातीलाच यंदाच्या ईदला सलमान खान विरूद्ध ऐश्वर्या राय असा सामना रंगणार होता. सलमानचा ‘रेस3’ आणि ऐश्वर्या राय बच्चनचा ‘फन्ने खां’ हे दोन्ही सिनेमे ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार होते. मात्र त्यानंतर ‘फन्ने खां'ची रिलीज डेट बदलण्यात आली येत्या १३ जुलैला रिलीज होणार आहे. 

Web Title: Aishwarya Rai Bachchan would be seen with Salman Khan in the film, but Ash refused!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.