ऐश्वर्या राय बच्चनने गुपचूप आॅर्डर केले ‘स्लिमींग आॅईल’ !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 14:24 IST2017-10-30T08:54:49+5:302017-10-30T14:24:49+5:30
ऐश्वर्या राय बच्चन सध्या ‘फन्ने खान’ या चित्रपटात बिझी आहे. यात ती लीड रोलमध्ये दिसणार आहे. आज ऐश्वर्याला सहा ...
.jpg)
ऐश्वर्या राय बच्चनने गुपचूप आॅर्डर केले ‘स्लिमींग आॅईल’ !!
ऐ ्वर्या राय बच्चन सध्या ‘फन्ने खान’ या चित्रपटात बिझी आहे. यात ती लीड रोलमध्ये दिसणार आहे. आज ऐश्वर्याला सहा वर्षांची मुलगी आहे. खरे तर, ऐश्वर्याला इतकी मोठी मुलगी आहे, हे तिच्याकडे पाहून अजिबात वाटत नाही. आजही ऐश्वर्याच्या सौंदर्यापुढे बड्या बड्या नट्या फेल ठरतात. आराध्याच्यावेळी प्रेग्नंट असताना ऐश्वर्याचे वजन बरेच वाढले होते. पण आराध्याच्या जन्मानंतर वर्षभरात ऐश्वर्या पुन्हा आपल्या आधीच्या हॉट अॅण्ड सेक्सी लूकमध्ये परतली. निश्चितपणे तुम्हाला ऐश्वर्याच्या या सौंदर्यामागचे रहस्य जाणून घ्यायला आवडेल.
‘मुंबई मिरर’चे मानाल तर ऐश्वर्याच्या या सौंदर्यामागे एक सीक्रेट आॅईल आहे. होय, एक आयुर्वेदीक तेल. स्वत:ता सुंदर ठेवण्यासाठी ऐश्वर्या आयुर्वेदीक स्लिमिंग आॅईल युज करते. अलीकडे तिने केरळमधून या तेलाचा एक बॉक्स मागवला. प्रेग्नंसीनंतर ऐश्वर्या हेच तेल वापरते आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेग्नंसीनंतरचं नव्हे तर त्यानंतर आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या शूटींगआधी ऐश्वर्या हेच तेल वापरते.
‘फन्ने खान’ या चित्रपटात ऐश्वर्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार राव लीड रोलमध्ये आहे. ऐश्वर्या यात एका गायिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. ऐश्वर्या व राजकुमार राव यांची जोडी या चित्रपटात पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. म्हणजेच ऐश्वर्या आपल्यापेक्षा दहा वर्षे लहान अभिनेत्यासोबत पुन्हा एकदा रोमान्स करताना यात आपण पाहाणार आहोत. यापूर्वी ‘ऐ दिल है मुश्लिल’मध्ये ती रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसली होती. ‘फन्ने खान’ या चित्रपटात तीन गाणी ऐश्वर्यावर चित्रीत करण्यात येणार आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीलाच ऐश्वयार्ची एंट्री एका डान्स साँगसोबत होणार आहे. यानंतर दुस-या गाण्यात ती अभिनेता राजकुमार रावसोबत रोमांस करताना दिसणार आहे. ज्याची शूटिंग मुंबईत होणार आहे, तर तिस-या गाण्यात ऐश्वर्या चित्रपटातील मुख्य अभिनेता अनिल कपूरसोबत दिसणार आहे. हे एक इमोशनल गाणं असेल.
ALSO READ: १३ अभिनेत्रींचे लैंगिक शोषण करणा-या ‘या’ निर्मात्याचा ऐश्वर्या रायवरही होता डोळा !
ऐश्वर्या राय बच्चन आणि अनिल कपूर हे दोघे जवळपास दोन दशकानंतर या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. याआधी सन 2000 मध्ये आलेल्या ‘हमारा दिल आपके पास है’ आणि १९९९ साली गाजलेल्या ‘ताल’ चित्रपटात हे दोघे एकत्र दिसले होते.