ऐश्वर्या राय बच्चन बनणार अनिल कपूरची हिरोईन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2017 14:19 IST2017-06-04T08:49:14+5:302017-06-04T14:19:14+5:30

ऐश्वर्या राय बच्चन अनिल कपूरची हिरोईन होणार! होय, ही बातमी पचायला तशी जड आहे. पण येत्या काळात ऐश्वर्या व ...

Aishwarya Rai Bachchan to become Anil Kapoor Heroine! | ऐश्वर्या राय बच्चन बनणार अनिल कपूरची हिरोईन!

ऐश्वर्या राय बच्चन बनणार अनिल कपूरची हिरोईन!

्वर्या राय बच्चन अनिल कपूरची हिरोईन होणार! होय, ही बातमी पचायला तशी जड आहे. पण येत्या काळात ऐश्वर्या व अनिल कपूर यांची जोडी पडद्यावर एकत्र दिसू शकते. राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा नवा चित्रपट ‘फन्ने खान’मध्ये ऐश्वर्याची वर्णी लागू शकते. या चित्रपटासाठी ऐश्वर्याला साईन करण्यात येणार असल्याची तूर्तास चर्चा आहे. गतवर्षी या चित्रपटाशी संबंधित एक पोस्टर अनिल कपूरने आपल्या टिष्ट्वटर अकाऊंटवर शेअर केला होता.
या चित्रपटासाठी अनिल कपूरला आधीच साईन करण्यात आले आहे. मेहरा या चित्रपटाचे प्रोड्यूसर असतील. तर अतुल मांजरेकर या चित्रपटाचा दिग्दर्शक असेल. या चित्रपटाद्वारे अतुल मांजरेकर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतोय. या चित्रपटात अनिल कपूर एका सिंगरच्या पित्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. ऐश्वर्याची भूमिका काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घोषणा लवकरच होईल, अशी अपेक्षा करूयात. कारण ‘ऐ दिल है मुश्किल’नंतर ऐश्वर्या रायला मोठ्या पडद्यावर पाहण्यास तिचे चाहते आतूर आहेत.

{{{{twitter_post_id####}}}}


‘फन्ने खान’ हा चित्रपट एक कॉमेडी सिंगींग कथेवर आधारित चित्रपट असेल. खरे तर हा चित्रपट आत्तापर्यंत तयार व्हायला हवा होता. पण ‘मिर्झिया’ या चित्रपटामुळे त्याचे काम काहीसे रखडले. ‘मिर्झिया’द्वारे अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर याने बॉलिवूड डेब्यू केले होते.
तूर्तास  राकेश मेहरा त्यांच्या ‘मेरे प्यारे प्रधानमंत्री’ या चित्रपटात व्यस्त आहेत. या चित्रपटाची कथा गांधी ग्राम योजनेवर आधारित असल्याचे कळतेय. आठ वर्षांचा मुलगा कन्हैय्या याची कथा यात दाखवली जाणार आहे. ज्याला आपल्या आईसाठी एक शौचालय बनवायचे असते.

Web Title: Aishwarya Rai Bachchan to become Anil Kapoor Heroine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.