​येणार प्रभास व अनुष्का शेट्टीची धमाकेदार जोडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 16:26 IST2017-06-02T10:56:08+5:302017-06-02T16:26:08+5:30

‘बाहुबली2’मधील अनुष्का शेट्टी व प्रभासची आॅनस्क्रीन केमिस्ट्री लोकांना प्रचंड आवडली. बाहुबली2’नंतर अनुष्का व प्रभास या दोघांच्या लिंकअपच्या बातम्याही आल्यात. ...

Aishwarya Rai Bachchan and Anushka Shetty | ​येणार प्रभास व अनुष्का शेट्टीची धमाकेदार जोडी!

​येणार प्रभास व अनुष्का शेट्टीची धमाकेदार जोडी!

ाहुबली2’मधील अनुष्का शेट्टी व प्रभासची आॅनस्क्रीन केमिस्ट्री लोकांना प्रचंड आवडली. बाहुबली2’नंतर अनुष्का व प्रभास या दोघांच्या लिंकअपच्या बातम्याही आल्यात. या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली.  हिंदी सिनेमाच्या इतिहासात ५०० कोटी रूपयांच्या कमाईचा आकडा पार करणारा ‘बाहुबली2’ पहिला चित्रपट बनला. विदेशात या चित्रपटाने १००० कोटींचा पल्ला गाठला. अर्थात असे असले तरी लोकांना या  कमाईच्या आकड्यांपेक्षा प्रभास व अनुष्काच्या केमिस्ट्रीत अधिक इंटरेस्ट आहे. त्यामुळेच आता आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत, ते ऐकून तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही.
होय, ‘बाहुबली2’च्या  यशानंतर प्रभास व अनुष्काचा एक सुपरडुपर हिट चित्रपट हिंदीत डब करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. २००९ मध्ये प्रभास व अनुष्का शेट्टीचा ‘बिल्ला’ हा चित्रपट आला होता. ‘बिल्ला’च्या निर्मात्यांनी हा चित्रपट हिंदीत आणण्याच्या हालचाली चालवल्या आहेत. ‘बिल्ला’ एक अ‍ॅक्शन थ्रीलर चित्रपट आहे. दक्षिणेत हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला होता. आता हा चित्रपट हिंदीत आला तर किती यशस्वी ठरेल, हे आत्ताच सांगता येणार नाही. पण प्रभास व अनुष्काचे चाहते या चित्रपटावर तुटून पडतील, एवढे नक्की. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे नाव ‘द रिटर्न आॅफ रेवेल2’ असे असेल.
तूर्तास अनुष्का व प्रभासची जोडी ‘साहो’मध्ये दिसणार असल्याचीही खबर आहे. ‘बाहुबली2’नंतर प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटाबद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
सध्या प्रभास अमेरिकेत हॉली डे एन्जॉय करतोय. सुट्टी संपवल्यानंतर तो या अ‍ॅक्शनपटाचे शूटींग सुरु करणार आहे.  सुजीत दिग्दर्शित या चित्रपटाची एक झलक अर्थात टीजर आपण ‘बाहुबली2’सोबत पाहिली आहेच. या चित्रपटाचे एकूण बजेट सुमारे १५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Aishwarya Rai Bachchan and Anushka Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.