Airport Fashion : ​श्रीदेवी आणि जान्हवी-खुशीचा स्टाईलिश अंदाज तुम्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2017 17:13 IST2017-01-29T06:10:27+5:302017-01-29T17:13:56+5:30

श्रीदेवी आणि तिच्या दोन्ही मुली जान्हवी व खुशी अलीकडे विमानतळावर दिसून आल्या.  आता तुम्ही म्हणाल, यात काय नवे. पण ...

Airport Fashion: Do you see Sridevi and Janhavi - a stylish style of happiness? | Airport Fashion : ​श्रीदेवी आणि जान्हवी-खुशीचा स्टाईलिश अंदाज तुम्ही पाहिलात का?

Airport Fashion : ​श्रीदेवी आणि जान्हवी-खुशीचा स्टाईलिश अंदाज तुम्ही पाहिलात का?

रीदेवी आणि तिच्या दोन्ही मुली जान्हवी व खुशी अलीकडे विमानतळावर दिसून आल्या.  आता तुम्ही म्हणाल, यात काय नवे. पण आहे. या तिघी मायलेकींची स्टाईल तुम्ही पाहायलाच हवी. जान्हवी यावेळी कॅज्युअल लूकमध्ये दिसली आणि खुशी व्हाईट टॉप आणि ब्लॅक स्कर्टमध्ये दिसली. तर जान्हवी आणि खुशीची मम्मा व्हाईट व ब्ल्यू कॉम्बिनेशनच्या स्टाईलिश ड्रेसमध्ये दिसली.   एकेकाळी चाहते श्रीदेवीच्या सौंदयार्ने घायाळ व्हायचे. तिच्या एक एक अदांवर जीव ओवाळून टाकायचे. आताश: तिच्या मुली जान्हवी आणि खुशी या दोघी तिच्या या वळणावर येऊन पोहोचल्या आहेत.  पन्नासी ओलांडलेल्या स्टाईलिश आईसोबत  जान्हवी व खुशीचे हे काही फोटो पाहून तुम्हालाही हे पटेल. तेव्हा तुम्हीही पाहाच, या तिघी मायलेकींचा स्टाईलिश अंदाज...









श्रीदेवीची लाडकी जान्हवी लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार अशी चर्चा आहे. त्यामुळे सध्या मीडियाचे सगळे लक्ष जान्हवीकडे आहे. जान्हवी जिथे जाईल तिथे पापाराझी तिच्या मागावर असतात, त्याचे हेच कारण आहे.  जान्हवी अलीकडेच तिचा कथित बॉयफ्रेन्ड शिखर पहाडिया याच्यासोबत दिसली होती. जान्हवी व शिखर दोघेही वांद्र्याच्या एका रेस्टॉरेंटमध्ये लंचसाठी पोहोचले होते. आता जान्हवी आणि शिखर दोघेही एकत्र म्हटल्यावर मीडियाच्या कॅमेºयांची क्लिक -क्लिक होणारच. पण मीडिया बाहेर उभा आहे म्हटल्यावर जान्हवीनेही हुशारी दाखवली. ती आणि शिखर दोघेही रेस्टारंटमधून निघताना वेगवेगळे निघाले. मीडियाकडे न बघता जान्हवी घाईघाईत आपल्या कारमध्ये बसली. तर शिखरही त्याच्या कारने आपल्या मार्गाने चालता झाला. जान्हवी व शिखर या दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे. 

ALSO READ : जान्हवी कपूरच्या डेब्यूची तयारी झालीय सुरू!
OMG!! कुणासोबत दिसली जान्हवी कपूर?

Web Title: Airport Fashion: Do you see Sridevi and Janhavi - a stylish style of happiness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.