सुशांतची हत्या की आत्महत्या , आज होऊ शकतो सगळ्यात मोठा खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 15:23 IST2020-09-04T15:21:57+5:302020-09-04T15:23:47+5:30
याचे शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाची चौकशी एनसीबी करते आहे.

सुशांतची हत्या की आत्महत्या , आज होऊ शकतो सगळ्यात मोठा खुलासा!
सुशांत राजपूत प्रकरणात ड्रग्ल अँगल समोर आल्यानंतर शुक्रवारी (4 सप्टेंबर) एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि सॅम्युल मिरांडाच्या धाड टाकली आहे. रियाचे शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाची चौकशी एनसीबी करते आहे. तर दुसरीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ते एम्सच्या रिपोर्टकडे. एम्सच्या रिपोर्टनंतर हे स्पष्ट होईल की सुशांतने आत्महत्या केली आहे की त्याची हत्या झाली.
रिपोर्ट येण्याची शक्यता
या रिपोर्टची वाट केवळ तपास यंत्रणाच नव्हे तर सुशांतचे कुटुंबिय आणि चाहतेसुद्धा प्रतीक्षा करीत आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या पोस्टमार्टम अहवालाची चौकशी करण्यासाठी सीबीआयने एम्सच्या डॉक्टरांची एक टीम तयार केली होती, जे विस्तृतपणे पोस्टमार्टम अहवालाची चौकशी करीत आहेत.
रिया होऊ शकते अटक
सुशांतच्या वडिलांनी पाटणामध्ये रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल केली आहे. यात त्यांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. E 24 च्या रिपोर्टनुसार आयपीसी कलम 306 (आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे) अतंगर्तच रिया चक्रवर्तीला अटक करण्यात येऊ शकते. सीबीआयच्या आतापर्यंतच्या तपासात रियाच्या आयुष्यात आल्यापासून सुशांतची तब्येत बिघडू लागली असल्याचे उघड झाले आहे. सीबीआयने सुशांतशी संबंधित असलेल्या अनेक लोकांचे जबाब नोंदविली असून यात तो खूप आनंदित व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे.