अयोध्या राम मंदिराचं दर्शन घेऊन अमिताभ यांनी पहिल्यांदाच दाखवलं घरातलं शिवमंदिर, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 03:13 PM2024-02-12T15:13:50+5:302024-02-12T15:16:05+5:30

अमिताभ यांनी पहिल्यांदाच त्यांच्या घरातल्या मंदिराचे फोटो सर्वांना दाखवले

After visiting the Ayodhya Ram temple, Amitabh Bachchan showed the Shiva temple in his house for the first time, the photo went viral | अयोध्या राम मंदिराचं दर्शन घेऊन अमिताभ यांनी पहिल्यांदाच दाखवलं घरातलं शिवमंदिर, फोटो व्हायरल

अयोध्या राम मंदिराचं दर्शन घेऊन अमिताभ यांनी पहिल्यांदाच दाखवलं घरातलं शिवमंदिर, फोटो व्हायरल

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे महानायक. अमिताभ (Amitabh Bachchan) किती धार्मिक आहेत हे सर्वांनाच माहित आहे. बिग बी अयोध्याराम मंदिर (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित होते. मुलगा अभिषेक बच्चनसोबत (Abhishek Bachchan) अमिताभ यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं. याशिवाय काहीच महिन्यांपुर्वी अमिताभ यांनी पुन्हा एकदा अयोध्येला (Ayodhya) जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं. अयोध्येवरुन (Ram Mandir) परतल्यावर अमिताभ यांनी घरातल्या मंदिराची झलक दाखवली. 

अमिताभ यांनी त्यांंचं घर जलसाच्या आतल्या मंदिरातले फोटो सर्वांना दाखवले. हे फोटो दाखवत बिग बी लिहीतात, "भगवान शंकराला दुधाचा अभिषेक, तर तुळशीला पाण्याचा.." अमिताभ यांच्या घरातल्या मंदिराचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत. अमिताभ यांच्या घरातील मंदिरात देवांची संगमरवरी मुर्ती दिसून येते. त्यांना ताजी फुलं वाहिलेली दिसतात. याशिवाय हार चढवलेला दिसतो. अनेकांनी अमिताभ यांच्या घरातील मंदिराचं कौतुक केलंय. 

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर.... अमिताभ प्रभास आणि दीपिका पादुकोणसोबत 'कल्की 2898 एडी' या सिनेमात विशेष भूमिकेत झळकणार आहेत. याशिवाय अमिताभ 'सेक्शन 84' या कोर्टरुम ड्रामा सिनेमात झळकणार आहेत. तसंच अनेक वर्षांनी अमिताभ सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत 'थलैवर 170' सिनेमात झळकणार आहेत. काहीच दिवसांपुर्वी मुंबईत या सिनेमाचं शुटींग सुरु झालंय.

 

Web Title: After visiting the Ayodhya Ram temple, Amitabh Bachchan showed the Shiva temple in his house for the first time, the photo went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.