'ॲनिमल'च्या यशानंतर संदीप रेड्डी वांगाने तिरुपतीत केले केस दान, नव्या सिनेमाची तयारी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 09:52 AM2024-03-07T09:52:42+5:302024-03-07T09:54:13+5:30

संदीप रेड्डी वांगा यांनी तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं असून केस दान केले.

After success of Animal Sandeep Reddy Vanga donates hair at tirupati balaji mandir | 'ॲनिमल'च्या यशानंतर संदीप रेड्डी वांगाने तिरुपतीत केले केस दान, नव्या सिनेमाची तयारी सुरु

'ॲनिमल'च्या यशानंतर संदीप रेड्डी वांगाने तिरुपतीत केले केस दान, नव्या सिनेमाची तयारी सुरु

२०२३ च्या डिसेंबरमध्ये आलेला 'ॲनिमल' सिनेमा प्रचंड गाजला. सिनेमावर अनेक टिकाटिप्पणी  झाली असली तरीही बॉक्स ऑफीसवर 'ॲनिमल'ने बक्कळ कमाई केली. 'ॲनिमल' चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचंही कौतुक झालं. 'ॲनिमल' सुपरहिट झाल्यानंतर संदीप त्यांच्या नवीन सिनेमाच्या शुटींगसाठी सज्ज झाले आहेत. पण त्याआधी त्यांनी एक खास गोष्ट केलीय. संदीप यांनी केस दान केले आहेत.

'ॲनिमल' चे दिग्दर्शक संदीप रेड्डींनी 6 मार्चला तिरुपती मंदिराला भेट दिली. शिवाय तिरुमला देवस्थानम येथे भगवान व्यंकटेश्वराच्या चरणी केस अर्पण करून आशीर्वाद घेतले. संदीप रेड्डी वांगा कुर्ता-पायजमा घालून आणि हातात प्रसाद घेऊन दर्शन घेतल्यानंतर मंदिरातून बाहेर पडताना दिसत आहेत. संदीप यांनी केस दान करुन मुंडन केलं. इच्छा पूर्ण झाल्यावर लोकं तिरुपतीला केस अर्पण करण्यासाठी येतात, असं सांगितलं जातं.

संदीप रेड्डी वांगाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तो आता 'स्पिरिट' आणि 'ॲनिमल पार्क' या दोन चित्रपटांच्या तयारीत व्यस्त आहे. स्पिरिटमध्ये तो बाहुबली स्टार प्रभाससोबत काम करत आहे आणि 'ॲनिमल' सिनेमाच्या दुसऱ्या भागात म्हणजेच 'ॲनिमल पार्क'मध्ये तो पुन्हा एकदा रणबीर कपूरसोबत बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे. संदीपच्या दोन्ही सिनेमांची उत्सुकता शिगेला आहे.

Web Title: After success of Animal Sandeep Reddy Vanga donates hair at tirupati balaji mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.