'शैतान'नंतर अजय देवगण-माधवनची जोडी पुन्हा गाजणार, या कॉमेडी सिनेमाच्या सिक्वेलमध्ये एकत्र येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 03:32 PM2024-05-24T15:32:15+5:302024-05-24T15:33:27+5:30

शैतान सिनेमा गाजवल्यानंतर अजय देवगण-आर.माधवन एका नव्या सिनेमातून एकत्र येणार असल्याची घोषणा झालीय (de de pyaar de 2, ajay devgn, r madhavan)

After Shaitaan Ajay Devgn Madhavan will reunite in de de pyaar de de 2 | 'शैतान'नंतर अजय देवगण-माधवनची जोडी पुन्हा गाजणार, या कॉमेडी सिनेमाच्या सिक्वेलमध्ये एकत्र येणार

'शैतान'नंतर अजय देवगण-माधवनची जोडी पुन्हा गाजणार, या कॉमेडी सिनेमाच्या सिक्वेलमध्ये एकत्र येणार

अजय देवगण - आर.माधवन यांचा 'शैतान' हा सिनेमा प्रचंड गाजला. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. बॉक्स ऑफिसवर या वर्षातला सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा म्हणून 'शैतान'कडे बघितलं जातंय. 'शैतान'मध्ये माधवन आणि अजयच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळाली. आता हे दोघे आगामी सिनेमातून पुन्हा एकत्र येणार आहेत. 'शैतान'मध्ये या दोघांनी सर्वांना घाबरवलं. पण आता मात्र हे दोघे प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत.

या गाजलेल्या कॉमेडी सिनेमाच्या सीक्वेलमध्ये येणार एकत्र

काहीच दिवसांपुर्वी अजय देवगणच्या आगामी 'दे दे प्यार दे 2' सिनेमाची घोषणा झाली होती. २०१९ साली अजय देवगण - तब्बू आणि क्रिती खरबंदा यांचा हा सिनेमा सुपरहिट झाला होता. आता याच सिनेमाच्या सिक्वेलबद्दल मोठा अपडेट समोर आलाय. ते म्हणजे 'दे दे प्यार दे 2' मध्ये माधवनची एन्ट्री झालीय. माधवन सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे 'दे दे प्यार दे 2' निमित्ताने पुन्हा एकदा अजय-माधवन जोडीला एकत्र पाहण्याची पर्वणी मिळणार आहे.

'शैतान'नंतर पुन्हा जमणार अजय- माधवनची जोडी

मीडिया रिपोर्टनुसार माधवन 'दे दे प्यार दे 2' मध्ये काम करण्यासाठी उत्सुक आहे. 'तनु वेड्स मनू'नंतर माधवनने गेल्या काही वर्षांमध्ये हलकीफुलकी कॉमेडी फिल्म केली नाहीय. त्यामुळे 'दे दे प्यार दे 2' निमित्ताने माधवन पुन्हा एकदा कॉमेडी फिल्म करण्यासाठी उत्सुक आहे. माधवनची भूमिका सिनेमात ट्विस्ट अँड टर्न निर्माण करणारी असेल यात शंका नाही. 'दे दे प्यार दे 2' हा सिनेमा १ मे २०२५ रोजी रिलीज होणार आहे.

Web Title: After Shaitaan Ajay Devgn Madhavan will reunite in de de pyaar de de 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.