केआरकेला ‘ते’ ट्वीट पडलं महागात, मनोज वाजपेयीनं ठोकला मानहानीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 11:52 AM2021-08-25T11:52:43+5:302021-08-25T11:54:58+5:30

काही दिवसांपूर्वी केआरकेने बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीसोबत ‘पंगा’ घेतला होता. आता हा ‘पंगा’ केआरकेला महागात पडला आहे.

after salman khan now manoj bajpayee filed a defamation complain against krk aka kamaal r khan | केआरकेला ‘ते’ ट्वीट पडलं महागात, मनोज वाजपेयीनं ठोकला मानहानीचा दावा

केआरकेला ‘ते’ ट्वीट पडलं महागात, मनोज वाजपेयीनं ठोकला मानहानीचा दावा

googlenewsNext
ठळक मुद्देयाआधी  बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने केआरके विरोधात  तक्रार दाखल केली होती.

बॉलिवूडचा स्वयंभू समीक्षक कमाल आर खान  (Kamaal R. Khan) अर्थात केआरके त्याच्या वादग्रस्त  ट्वीटमुळे नेहमीच चर्चेत असतो. केआरकेने  ट्वीट केले आणि त्यावरून वाद झाला नाही, असे अभावानेच घडते. काही दिवसांपूर्वी केआरकेने बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीसोबत (Manoj Bajpayee ) ‘पंगा’ घेतला होता. आता हा ‘पंगा’ केआरकेला महागात पडला आहे. होय,  मनोज वाजपेयीने मंगळवारी इंदौर जिल्हा न्यायालयात केआरके विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. 
मनोज वाजपेयीचे वकील परेश एस. जोशी यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, मनोज वाजपेयी यांच्यावतीने केआरकेविरोधात एका आक्षेपार्ह  ट्वीट प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  केआरके (KRK) विरोधात कमल 500 अंतर्गत खटला दाखल करण्याची विनंती यात केली आहे. 26जुलैला मनोज विरोधात केआरकेने अपमानास्पद  ट्वीट  केले. यामुळे इंदौरमधील चाहत्यांमध्ये मनोज वाजपेयीची खराब झाली, असे तक्रारीत म्हटले आहे.  


 
काय आहे प्रकरण

केआरकेने 26 जुलैला मनोज वाजपेयीविरोधात एक आक्षेपार्ह  ट्वीट केले होते. या  ट्वीटमध्ये त्याने मनोजला ‘चरसी’ आणि ‘गंजेडी’ म्हटले होते. मनोज वाजपेयीची ‘फॅमिली मॅन 2’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाल्यानंतर केआरके बरळला होता. ‘मी फालतु नाही आणि म्हणून मी वेबसीरिज पाहत नाही. तुम्हाला चरसी आणि गंजेडी मनोज का आवडतो? तुम्ही बॉलिवूडच्या चरसी आणि गंजेडी लोकांचा राग करता, मग सर्वांचाच राग करा,’ अशा आशयाचे  ट्वीट  केआरकेने केले होते.
याआधी  बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने केआरके विरोधात  तक्रार दाखल केली होती. केआरकेने सलमान आणि त्याची कंपनी बीइंग ह्यूमन विरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याचा आरोप सलमानच्यावतीने करण्यात आला होता.

Web Title: after salman khan now manoj bajpayee filed a defamation complain against krk aka kamaal r khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.