सलमान खाननंतर अमिताभ बच्चन यांचे झाले दिग्दर्शकासोबत भांडण..कारण ऐकून तुम्ही ही व्हाल हैराण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 16:28 IST2017-10-03T10:58:11+5:302017-10-03T16:28:11+5:30

काही माहिन्यांपूर्वीच ट्यूबलाईटच्या शूटिंग दरम्यान सलमान खानचे भांडण चित्रपटाचा दिग्दर्शक कबीर खानसोबत झाले होते.  क्रिएटिव्ह डिफरेंसला दोघांमध्ये सेटवर खूप ...

After Salman Khan, Amitabh Bachchan has got a fight with the director, because you will hear this. | सलमान खाननंतर अमिताभ बच्चन यांचे झाले दिग्दर्शकासोबत भांडण..कारण ऐकून तुम्ही ही व्हाल हैराण..

सलमान खाननंतर अमिताभ बच्चन यांचे झाले दिग्दर्शकासोबत भांडण..कारण ऐकून तुम्ही ही व्हाल हैराण..

ही माहिन्यांपूर्वीच ट्यूबलाईटच्या शूटिंग दरम्यान सलमान खानचे भांडण चित्रपटाचा दिग्दर्शक कबीर खानसोबत झाले होते.  क्रिएटिव्ह डिफरेंसला दोघांमध्ये सेटवर खूप भांडण झाली होती. ऐवढेच नाही तर सलमानने यापुढे मी कबीरसोबत चित्रपटात काम करणार नाही असे सुद्धा सांगितले होते. यावेळी आणखीन एका कलाकाराचा दिग्दर्शकसोबत वाद झाला आहे. हा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून बिग बी अमिताभ बच्चन आहेत. सध्या बिग बी ठग्स ऑफ हिंदुस्तानच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत आमीर खान सुद्धा झळकणार आहे. मिड-डे मध्ये आलेल्या वृत्तानुसार अमिताभ बच्चन आणि चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्य यांच्यात विशिष्ट्य सीनला घेऊन वाद झाला आहे. ज्यानंतर तब्बल तीन तास चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. त्यानंतर आमीर खानने मध्यस्थी करुन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर शूटिंग पुन्हा सुरु करण्यात आले.  अमिताभ बच्चन यांना या चित्रपटातील एक सीन अजिबात आवडला नव्हता. दिग्दर्शक विजय आचार्या कृष्णा यांच्यासोबत त्यांचा वाद झाला. ज्यामुळे तीन तास शूटिंग थांबवण्यात आले. आमीर खानने हा वाद मिटवला ज्यामुळे चित्रपटाची शूटिंग पूर्ण होऊ शकली.      

काही दिवसांपूर्वी  बिग बींचा ठग्स ऑफ हिंदुस्तानमधला लुक लीक झाला होता. सोशल मीडियावर सेटवरचे फोटो व्हायरल झाले होते. या चित्रपटाची कथा फारच इंट्रेस्टिंग आहे.हा चित्रपट हॉलिवूडचा पायरेट्स ऑफ केरिबियन शी मिळता जुळता आहे. चित्रपटात चार चोर आहेत आमीर खान, अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख आणि कॅटरिना कैफ यांची गोष्ट आहे. यात बिग बी आमीर खानच्या वडिलांची भूमिका साकार करणार आहेत. पहिल्यांदाच दोघे एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. त्यामुळे त्यांचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतील यात काही शंका नाही. पुढच्या वर्षी दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

ALSO READ :  ‘ठग्स आॅफ हिन्दोस्तान’च्या सेटवरून लिक झाला महानायक अमिताभ बच्चनचा लूक!

ठग्स ऑफ हिंदुस्ताननंतर आमीर खान 'सैल्यूट' या चित्रपटात भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांची भूमिका साकारणार आहे. 

Web Title: After Salman Khan, Amitabh Bachchan has got a fight with the director, because you will hear this.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.