सलमान खाननंतर अजय देवगणने ही नाकारला राजकुमार संतोषींचा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 10:46 IST2017-12-29T05:16:13+5:302017-12-29T10:46:29+5:30

एकावेळी इंडस्ट्रीमध्ये अशी होती की दिग्दर्शक राकुमार संतोषी यांच्या सोबत काम करायला अभिनेते उत्सुक असायचे. मात्र आता एक वेळ ...

After Salman Khan, Ajay Devgn rejected this film of Rajkumar Santoshi | सलमान खाननंतर अजय देवगणने ही नाकारला राजकुमार संतोषींचा चित्रपट

सलमान खाननंतर अजय देवगणने ही नाकारला राजकुमार संतोषींचा चित्रपट

ावेळी इंडस्ट्रीमध्ये अशी होती की दिग्दर्शक राकुमार संतोषी यांच्या सोबत काम करायला अभिनेते उत्सुक असायचे. मात्र आता एक वेळ अशी अली आहे की त्यांच्यासोबत काम करायला कलाकार तयार नाहीत. राजकुमार संतोषी यांना चित्रपट तयार करायचा आहे मात्र कोणातही मोठा स्टार त्यांच्यासोबत काम करायला तयार नाही. सलमान खानला घेऊन राजकुमार संतोषी चित्रपट तयार करणार होते मात्र आता अशी चर्चा आहे की सलमान खानने यासाठी नकार दिला आहे. या मागचे कारण म्हणजे सलमानसा स्क्रिप्ट आवडली नाही. सलमानने चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये दिग्दर्शकाला काही बदल करायला सांगितले मात्र ते त्यांनी केले नाहीत. परिणामी सलमानने काम करण्यास नकार दिला.     

त्यानंतर आपली स्क्रिप्ट घेऊन राजकुमार संतोषी अजय देवगणकडे गेले. अजय देवगणने चित्रपटाची साइनिंग अमाऊंटसुद्धा घेतली. मात्र आता मिळत असलेल्या माहितीनुसार अजयने ती साइनिंग अमाउंट परत केली आहे. अजय चित्रपटात काम करण्यास का नकार दिला या मागचे कारण अद्याप समजू शकले नाही. तुम्हाला माहितीच असेल कि अजय देवगणने संतोषींच्या अनेक चित्रपटात काम केले आहे. ज्याच भगत सिंग, हल्ला बोल, लज्जा आणि खाकी सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. तर सलमान खानसोबत राजकुमार संतोषींच्या अंदाज अपना अपना आणि जानम समझा करो सारखे हिट चित्रपट दिले आहेत.

2018 हे वर्ष सलमान खानच्या फॅन्ससाठी खास असणार आहे.  सलमानचा रेस 3, दबंग 3 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रेस 3 मध्ये सलमान खान दमदार अॅक्शन करताना दिसणार आहे. तसेच सलमानसोबत यात जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर यांच्यासोबतच बॉबी देओल, साकिब सलीम आणि डेजी शाह हे देखील दिसतील. 

ALSO READ :  BOX OFFICE : ‘बाहुबली’नंतर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला ‘टायगर जिंदा है’!


'दबंग 3' मध्ये सलमान सोबत मौनी रॉय दिसणार आहे. याआधीच्या दबंगच्या सिरीजमध्ये सोनाक्षी सिन्हा होती. मात्र दबंग 3 मध्ये तिला मौनीने रिप्लेस केले आहे.   ‘रेस-३’नंतर सलमान भाऊ अरबाज खानच्या ‘दबंग-३’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 

Web Title: After Salman Khan, Ajay Devgn rejected this film of Rajkumar Santoshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.