अभिनेत्री मुमताज यांना जिवंतपणीच वाहिली श्रद्धांजली, पंजाबच्या मंत्र्यांच्या ट्विटनंतर व्हायरल झाली बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 06:39 PM2020-05-21T18:39:38+5:302020-05-21T18:40:57+5:30

मागील वर्षीदेखील मे महिन्यातच मुमताज यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. यावेळी पंजाबच्या एका मंत्र्यांनी मुमताज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

After Punjab Ministers Tribute Tweet Family Denies Death News Of Actress Mumtaz TJL | अभिनेत्री मुमताज यांना जिवंतपणीच वाहिली श्रद्धांजली, पंजाबच्या मंत्र्यांच्या ट्विटनंतर व्हायरल झाली बातमी

अभिनेत्री मुमताज यांना जिवंतपणीच वाहिली श्रद्धांजली, पंजाबच्या मंत्र्यांच्या ट्विटनंतर व्हायरल झाली बातमी

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री मुमताज पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. पुन्हा एकदा त्यांच्या निधनाची अफवा सगळीकडे पसरत आहे. मागील वर्षीदेखील मे महिन्यातच मुमताज यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. यावेळी पंजाबच्या एका मंत्र्यांनी मुमताज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र एका वेबसाईटच्या रिपोर्ट नुसार त्यांनी मुमताज यांच्या कुटुंबाशी संपर्क साधला असता त्या एकदम व्यवस्थित असल्याचे समजले

गेल्या वर्षी याच महिन्यात त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती. या बातमीने सगळ्यांना धक्का बसला होता ही अफवा मे महिन्यात पसरली होती. आता यावर्षी देखील याच महिन्यात त्यांच्या निधनाचे वृत्त वाऱ्यासारखे पसरत आहे मुख्य म्हणजे हा गैरसमज पंजाबचे क्रिडा मंत्री राणा गुरमित एस सोढी यांच्या ट्विटनंतर पसरला.


राणा गुरमित सोढी यांनी ट्विट केले की मुमताज जी आपल्यात नाही राहिल्या आहेत. माझ्यासाठी हा मोठा धक्का आहे. मी माझी अत्यंत जवळची मैत्रीण गमावली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची लंडनमध्ये भेट झाली होती.  त्यांचे जाणे ही माझी वैयक्तिक हानी आहे. ईश्वर त्यांच्या आत्मास शांती देवो. तुम्ही निघून गेलात मात्र तुम्हाला कोणीच विसरु शकत नाही.
हे ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होता आहे. फराह खान अली यांनी मुमताज च्या मुलीसोबत चर्चा केली आणि सांगितले की त्या व्यवस्थित आहेत. मिलाप झवेरी यांनी देखील हे वृत्त खोटे असल्याचं सांगितलं आहे. फराह खान अली आणि मिलाप झवेरी हे मुमताज यांच्या मुलीच्या सासरचे नातेवाईक आहेत
 

Web Title: After Punjab Ministers Tribute Tweet Family Denies Death News Of Actress Mumtaz TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumtazमुमताज