पतीने साथ सोडल्यानंतर धुणीभांडे करून घर चालवायची; आज आहे बॉलिवूडची प्रसिद्ध स्टंटवुमन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 15:57 IST2017-09-23T10:27:03+5:302017-09-23T15:57:03+5:30

इच्छा आणि ध्येय ठरलेले असेल तर आयुष्यात येणाºया प्रत्येक अडचणींवर सहज मात करता येते. याचे उत्तम उदाहरण म्हणून बॉलिवूडची ...

After leaving the husband, run away from the house; Bollywood's famous StuntWoman !! | पतीने साथ सोडल्यानंतर धुणीभांडे करून घर चालवायची; आज आहे बॉलिवूडची प्रसिद्ध स्टंटवुमन!!

पतीने साथ सोडल्यानंतर धुणीभांडे करून घर चालवायची; आज आहे बॉलिवूडची प्रसिद्ध स्टंटवुमन!!

्छा आणि ध्येय ठरलेले असेल तर आयुष्यात येणाºया प्रत्येक अडचणींवर सहज मात करता येते. याचे उत्तम उदाहरण म्हणून बॉलिवूडची प्रसिद्ध स्टंटवुमन गीता टंडन हिचे देता येईल. अर्ध्यातच वैवाहिक जीवन संपल्यानंतर गीताने खचून न जाता स्वत:ला सिद्ध केले. राजस्थानच्या कोटा शहरात जन्मलेल्या गीता टंडन ही जरी आज बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध स्टंटवुमन म्हणून प्रसिद्ध असली तरी तिचे पूर्वीचे आयुष्य खूपच धकाधकीचे आणि संगर्षपूर्ण राहिले आहे. दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, मलाइका अरोरा यांसारख्या अभिनेत्रींच्या बॉडीडबलची भूमिका करणारी गीता कुठलाही स्टंट अगदी सहजपणे करते. मग चालत्या बाईक चेंज करणे असो अथवा उंच इमारतीवरु न उडी मारणे असो गीता अगदी चोखपणे हे सगळे स्टंट निभावते. 

परंतु तिला हे सर्व धाडसी काम करण्यासाठी खूप मेहनत आणि संघर्ष करावा लागला आहे. वयाच्या पंधराव्या वर्षीच विवाहाच्या बंधनात अडकलेल्या गीताचे वैवाहिक जीवन फार काळ टिकले नाही. पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर घर चालविण्यासाठी तिने धुणीभांडे करण्याचे काम केले. गावाकडे असल्यामुळे तिला शेतातही काम करावे लागत असे. शिवाय शेण उचलण्यापर्यंतची कामे गीता करायची. कुटुंबात कर्ता व्यक्ती नसल्यामुळे गीतानेच संपूर्ण परिवाराच्या पालनपोषणाची जबाबदारी स्विकारली होती. याविषयी बोलताना गीता सांगते की, ‘आज जरी मी बॉलिवूडची प्रसिद्ध स्टंटवुमन असली तरी, मी असे दिवस पाहिले आहेत की, आम्हाला दोन वेळेचे जेवण मिळत नसायचे. अनेकदा आम्हाला उपाशीपोटीच झोपावे लागे. माझा खूपच गरीब कुटुंबात जन्म झालेला आहे.’ 



पुढे बोलताना गीता सांगतेय की, ‘मी लहान असताना आईचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिवाराची वाताहत झाली होती. वास्तविक सुरुवातीला आमचे दिवस चांगले जात होते. एक दिवस अचानकच आईचा मृत्यू झाला. त्यावेळी मी केवळ सात वर्षांची होती. वडीलही पूर्णपणे खचले होते. पुढे वडिलांनी आम्हाला आजीकडे सोडले. आजी गावी राहत असल्याने मी तिथे सर्वप्रकारचे कामे करावी लागत असत. शेण उचलण्यापासून ते शेतातील सर्व कामे मी करायची. एक दिवस अचानकच वडिलांनी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. मात्र मुंबईत आल्यानंतरही आम्हाला खूप कष्ट करावे लागले. बºयाचदा आम्हाला उपाशीपोटी झोपावे लागले.’

गीताने तिच्या वैवाहिक जीवनाविषयी बोलताना सांगितले की, ‘माझ्या वयाच्या १५व्या वर्षी लग्न झाले. जयपूर येथील एका परिवारात मला देण्यात आले होते. परंतु सासरी गेल्यानंतर माझे नशीब बदलले नाही. उलट हालपेष्टांचे जीवन तेव्हांही जगावेच लागत होते. लग्नाच्या 5 वर्षांनंतर दोन मुलांचा जन्म झाला आणि माझा घटस्फोट झाला. मी पुन्हा बेघर झाले. मात्र या पाच वर्षांदरम्यान मला जो त्रास सहन करावा लागला, तो आठवला तरी अंगावर शहारे येतात. मी घरगुती हिंसाचाराची बळी पडले होते. परंतु माझ्यासोबत जे झाले मुलांसोबत होऊ द्यायचे नाही, असा मी निश्चय केला. पुढे मी धुणीभांडीचे काम करण्यास सुरुवात केली.’ 



गीता टंडनला २००८ साली एका मालिकेत स्टंट करण्याची आॅफर मिळाली. त्यासाठी तिने कुठेही प्रोफेशनल ट्रेनिंग घेतले नव्हते. बिना ट्रेनिंगचेच तिने स्टंट केले. याविषयी गीता सांगतेय की, ‘सुरुवातीला मला याविषयी भीती वाटायची, परंतु मुलांचा विचार समोर यायचा. जीव धोक्यात घालून मी स्वत:ला या क्षेत्रात झोकून दिले. 

Web Title: After leaving the husband, run away from the house; Bollywood's famous StuntWoman !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.