कटप्पा सिक्रेटनंतर... ‘बाहुबलीची देवसेना कोण असेल?’ या यक्ष प्रश्नाच्या उत्तराची चाहत्यांना प्रतीक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2017 16:25 IST2017-05-31T10:55:49+5:302017-05-31T16:25:49+5:30

माहिष्मती सामाज्याच्या, रक्षणासाठी जिवाची बाजी लावणाºया आमरेंद्र बाहुबली अर्थात प्रभास याच्या लग्नावरून सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. तो एका ...

After Katappa Secret ... Waiting for fans to answer the question of 'Who will be Devsu of Bahubali?' | कटप्पा सिक्रेटनंतर... ‘बाहुबलीची देवसेना कोण असेल?’ या यक्ष प्रश्नाच्या उत्तराची चाहत्यांना प्रतीक्षा!

कटप्पा सिक्रेटनंतर... ‘बाहुबलीची देवसेना कोण असेल?’ या यक्ष प्रश्नाच्या उत्तराची चाहत्यांना प्रतीक्षा!

हिष्मती सामाज्याच्या, रक्षणासाठी जिवाची बाजी लावणाºया आमरेंद्र बाहुबली अर्थात प्रभास याच्या लग्नावरून सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. तो एका उद्योगपतीच्या नातीबरोबर विवाह करणार असल्याचे बोलले जात होते; मात्र विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभास लगेचच लग्न करणार नसून, त्याच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटात देवसेना अर्थात अनुष्का शेट्टी हिच्याबरोबर काम करणार आहे. त्यामुळे एकेकाळी निर्माण झालेल्या ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ या प्रश्नाच्या उत्तरानंतर ‘बाहुबलीची देवसेना कोण असेल?’ या यक्ष प्रश्नाचे उत्तर चाहत्यांना हवे आहे. 

असे म्हटले जात आहे की, प्रभास २०१८ मध्ये विवाह करणार आहे. ‘द टाइम्स आॅफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार प्रभास लवकरच एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या नातीबरोबर विवाह करणार आहे. रासी सिमेंटचे मालक भूपती राजू आणि प्रभासच्या फॅमिलीमध्ये सध्या लग्नाची चर्चा सुरू आहे; मात्र इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार प्रभासच्या प्रवक्त्याकडून हे वृत्त निराधार असल्याचे म्हटले. त्याचबरोबर माध्यमांमध्ये अशीही चर्चा रंगत आहे की, प्रभास ‘बाहुबली-२’मध्ये त्याची आॅनस्क्रीन पत्नी देवसेनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिच्याबरोबरच रिअल लाइफमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे; मात्र दोघांकडून त्यांच्या नात्याला अद्यापपर्यंत दुजोरा दिला नसल्याने या चर्चा म्हणजेच निव्वळ अफवा असल्याचे बोलले जात आहे. 



सध्या प्रभास जगभरात प्रसिद्धी झोतात आहे. त्याच्या चाहत्यांसाठी तर तो गळ्यातील ताईत बनला आहे. अशात त्याच्या रिल लाइफबरोबरच रिअल लाइफमधीलही इत्यंभूत माहिती मिळविण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. अशात त्याच्या लग्नावरून सध्या चाहत्यांमध्ये घमासान निर्माण झाले असून, ‘बाहुबलीची देवसेना कोण असेल?’ असा यक्ष प्रश्न चाहत्यांसमोर उपस्थित झाला आहे. सध्या प्रभास अमेरिकेत सुट्या एन्जॉय करीत असून, पाच जून रोजी तो भारतात परतणार आहे. 

अमेरिकेहून परतताच तो त्याच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजित रेड्डी करत आहेत. असे म्हटले जात आहे की, चित्रपटाच्या बाहुतांश भागाचे शूटिंग मुंबईमध्येच केले जाणार आहे. पुढच्यावर्षी हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी व्हर्जनमध्ये रिलीज केला जाणार आहे. प्रभासच्या ‘बाहुबली-२’ने बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली असून, लवकरच हा चित्रपट दोन हजार कोटीचा आकडा गाठण्याची शक्यता आहे. 

Web Title: After Katappa Secret ... Waiting for fans to answer the question of 'Who will be Devsu of Bahubali?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.