चित्रपटानंतर प्रियांका चोप्रा बनवणार वेबसिरिज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2017 17:49 IST2017-07-06T12:19:59+5:302017-07-06T17:49:59+5:30

प्रियांका चोप्रा हे नाव आता फक्त बॉलिवूडपर्यंत मर्यादित राहिलेल नाही तर ते आता जगाच्या नकाक्षावर आले आहे. बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्ये ...

After the film, Priyanka Chopra will be making a web site | चित्रपटानंतर प्रियांका चोप्रा बनवणार वेबसिरिज

चित्रपटानंतर प्रियांका चोप्रा बनवणार वेबसिरिज

रियांका चोप्रा हे नाव आता फक्त बॉलिवूडपर्यंत मर्यादित राहिलेल नाही तर ते आता जगाच्या नकाक्षावर आले आहे. बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्ये ही तिचे अनेक चाहते आहेत. सध्या प्रियांका हॉलिवूडच्या 'ए किड लाइक जॅक'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. तसेच ती ‘इझंट इट रोमॅण्टिक’ या चित्रपटात ही झळकणार आहे. क्वांटिकोच्या तिसऱ्या सीजनमध्ये ही प्रियांका असणार आहे. याच बरोबर प्रियांकाने पर्पल पेबल पिक्चर प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरच्या खाली अनेक प्रादेशिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता प्रियांका वेब सिरिजमध्ये आपला हात आजमवणार आहे.

या गोष्टीची माहिती प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी एका वेबसाईटला दिली आहे त्या म्हणाल्या, ''जीएसटीचा परिणाम एंटरटेंमेंट इंटस्ट्रीवर झाला आहे. जर चित्रपटांच्या तिकिटांच्या दरात वाढ झाली तर लोक चित्रपट बघायला येणार नाहीत. याचा प्रभाव बिझनेसवर होईल. आम्ही आतापर्यंत आमच्या प्रॉडक्शन हाऊस मार्फत अनेक चित्रपट तयार केले आहेत आणि पुढे देखील करणार आहोत. पण मला असे वाटते पुढचे सगळे भविष्य डिजिटलचे आहे. त्यामुळे आम्ही वेबसिरीज तयार करणार आहोत.'' पर्पल प्रॉडक्शनने आतापर्यंत विविध प्रादेशिक चित्रपट तयार केले आहेत. ज्यात व्हेंटिलिटर, भोजपुरी चित्रपट बम बम बोल रहा है काशी, पंजाबीत 'सरवन' या चित्रपटांचा समावेश आहे. व्हेंटिलिटर चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.तसेच या चित्रपटात प्रियांकाने पहिल्यांदाच मराठी गाणं गायले आहे. प्रियांका अनिरुद्ध रॉय चौधरी यांच्या महिलाकेंद्रीत चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. याशिवाय  संजय लीला भन्साळींसोबत तिची काही चित्रपटांवर चर्चा सुरु आहे. आता ती नक्की कोणकोणत्या चित्रपटात झळकणार हे बघण्यासाठी प्रियांकाची भारतात परतण्याची वाट पाहावी लागणार.   

Web Title: After the film, Priyanka Chopra will be making a web site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.