बॉलिवूडनंतर आता मराठी इंडस्ट्रीत स्वतःचे प्रस्थ निर्माण करायचे आहे ः प्रशांत इंगोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2017 17:43 IST2017-05-08T12:13:17+5:302017-05-08T17:43:17+5:30

प्रशांत इंगोलेने बाजीराव मस्तानी, रेस 2 यांसारख्या चित्रपटांमध्ये गाणी लिहिली आहेत. बाजीराव मस्तानी या चित्रपटात त्यांनी लिहिलेले मल्हारी हे ...

After Bollywood, now there is a need to create its own movement in the Marathi industry: Prashant Ingole | बॉलिवूडनंतर आता मराठी इंडस्ट्रीत स्वतःचे प्रस्थ निर्माण करायचे आहे ः प्रशांत इंगोले

बॉलिवूडनंतर आता मराठी इंडस्ट्रीत स्वतःचे प्रस्थ निर्माण करायचे आहे ः प्रशांत इंगोले

रशांत इंगोलेने बाजीराव मस्तानी, रेस 2 यांसारख्या चित्रपटांमध्ये गाणी लिहिली आहेत. बाजीराव मस्तानी या चित्रपटात त्यांनी लिहिलेले मल्हारी हे गाणे तर प्रचंड गाजले होते. रेस 2 या चित्रपटातील पार्टी साँगमुळे प्रशांतला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. त्याच्या एकंदर कारकिर्दीविषयी त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

तू हॉटेल मॅनेजमेंटचा विद्यार्थी असताना फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियर करण्याचा विचार कसा केलास?
मी कॉलेजमध्ये असताना कविता लिहित असे. पण मला जेवण बनवण्याची आवड असल्याने मी हॉटेल मॅनेजमेंट करण्याचा विचार केला. मात्र मी एक चांगला गीतकार असल्याचे माझ्या मित्रांचे म्हणणे होते. त्यांनी मला या क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि मी पुणे सोडून मुंबईला आलो. 2001 पासून मी स्ट्रगल करायला सुरुवात केली. मी अनेक संगीतकारांना भेटून माझी गाणी त्यांना ऐकवत असे. 

बॉलिवूडमध्ये कुणीही गॉडफादर नसताना करियर करणे हे किती कठिण आहे?
मी करियर करायचे असा विचार करून मुंबईत आलो. पण इथे आल्यावर मी चित्रपटसृष्टीतील कोणालाच ओळखत नव्हतो. हळूहळू करून मी काही लोकांचे नंबर मिळवले. त्यांना जाऊन भेटलो. असे करता करता आ देखे जरा या चित्रपटातील एका गाण्यासाठी मला संगीतकाराने बोलवले. मी लिहिलेले गाणे त्यांना आवडले आणि माझ्या करियरला सुरुवात झाली. अनेक वर्षं स्ट्रगल केल्यानंतर मला माझे पहिले गाणे मिळाले होते. कोणीही गॉडफादर नसताना करियर करणे हे खूपच अवघड असते.

तुझ्या करियरचा टर्निंग पॉईंट काय ठरला?
रेस 2 या चित्रपटासाठी मी लिहिलेले गाणे प्रचंड गाजले. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण रेस 2 या चित्रपटातील गाणे मी केवळ 14 मिनिटांत लिहिले होते. या चित्रपटामुळे मला मेरी कोम, बाजीराव मस्तानीसारखे चित्रपट मिळाले. बाजीराव मस्तानी या चित्रपटातील मल्हारी गाण्याने तर लोकांना अक्षरशः वेड लावले. रेस 2 या चित्रपटामुळे माझ्या कारकिर्दीला एक वेगळे वळण मिळाले असे मी नक्कीच म्हणेन.

तू आता एका मराठी चित्रपटासाठी कथा लिहिणार आहेस, हे ऐकले ते खरे आहे का?
मी मराठी चित्रपटासाठी सध्या एक कथा लिहित असून लोकांच्या वागणुकीवर या चित्रपटाची कथा असणार आहे. या चित्रपटाची कथा लिहून पूर्ण झाली असून या चित्रपटाची सगळी गाणी देखील मीच लिहिणार आहे आणि त्याचसोबत मी मराठी हॉरर चित्रपटासाठी गाणे लिहिले असून ते एक रोमँटिक साँग आहे. बॉलिवूडनंतर आता माझा मराठी इंडस्ट्रीतील प्रवास लवकरच सुरू होणार आहे. 

Web Title: After Bollywood, now there is a need to create its own movement in the Marathi industry: Prashant Ingole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.