बिग बॉसनंतर 'पठान'च्या शूटिंगला सुरूवात करणार सलमान खान, शाहरूख खानही मुख्य भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 19:26 IST2021-02-15T19:26:01+5:302021-02-15T19:26:32+5:30
सलमानने सांगितले की पठाणच्या शूटिंगला बिग बॉसचे शूटिंग संपल्यानंतर सुरूवात करणार आहे.

बिग बॉसनंतर 'पठान'च्या शूटिंगला सुरूवात करणार सलमान खान, शाहरूख खानही मुख्य भूमिकेत
बॉलिवूडचा दबंग खान सलमानने सांगितले की पठाणच्या शूटिंगला बिग बॉसच्या शूटिंगनंतर सुरूवात करणार आहे. या चित्रपटात शाहरूख खान मुख्य भूमिकेत आहे. सध्या बिग बॉसचा १४वा सीझन सुरू आहे. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्स बॅनर अंतर्गत होत आहे आणि याचे दिग्दर्शन वॉरचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद करत आहेत. शाहरूख खान २०१८ साली झिरो चित्रपटानंतर रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. या चित्रपटात सलमान खानने केमिओ केला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान खान 'पठान' चित्रपटात केमिओ करणार आहे. पण यावेळेस त्याची भूमिका थोडी मोठी असणार आहे. सलमान खानने शनिवारी रात्री म्हटले की, जीवन चालत राहते आणि शोदेखील चालू राहतो. जेव्हा हा शो (बिग बॉस) संपेल तेव्हा मी पठाणचे काम करेन आणि मग टाइगर ३ आणि त्यानंतर कभी ईद कभी दिवालीचे काम करेन.
बिग बॉसशी निगडीत सूत्रांनी सांगितले की, कलर्स टीव्हीच्या बिग बॉसचा पुढील सीझन आठ महिन्यांनंतर येईल. पठानचे शूटिंह मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झाले आणि टायगर फ्रेंचाइजीच्या चित्रपटाच्या शूटिंगला पुढील महिन्यात सुरूवात होणार आहे.
यापूर्वी सलमान खान १९८८ साली रिलीज झालेला चित्रपट कुछ कुछ होता हैमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात शाहरूख खान मुख्य भूमिकेत होता. तर शाहरूख खान सलमान खानचा चित्रपट ट्यूबलाइट आणि हर दिल जो प्यार करेगा सिनेमात केमिओ करताना दिसला होता.