‘बाहुबली2’नंतर ‘चंगेज खान’साठी असा तयार! येतोय आणखी एक बिग बजेट सिनेमा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2017 17:09 IST2017-06-04T07:51:39+5:302017-06-04T17:09:07+5:30
‘बाहुबली2’नंतर त्याच तोडीच्या एका नव्या चित्रपटासाठी तयार असा. होय, डॉर्विन मास मीडिया लिमिटेडचे यंग एंटरप्रेन्योर हरिनाथ सिंह यांनी चंगेज ...

‘बाहुबली2’नंतर ‘चंगेज खान’साठी असा तयार! येतोय आणखी एक बिग बजेट सिनेमा!!
‘ ाहुबली2’नंतर त्याच तोडीच्या एका नव्या चित्रपटासाठी तयार असा. होय, डॉर्विन मास मीडिया लिमिटेडचे यंग एंटरप्रेन्योर हरिनाथ सिंह यांनी चंगेज खान याच्यावर बायोपिक बनविण्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी त्यांनी फिल्म मेकर राजेंद्र व करण बहल यांच्याशी हात मिळवणी केली आहे. हे बायोपिक केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्याचा त्यांना मानस आहे. ‘बाहुबली2’नंतर निर्मात्यास चंगेज खानावर बायोपिक साकारण्याची प्रेरणा मिळाली. हा चित्रपट एक बिग बजेट सिनेमा असेल आणि ‘बाहुबली’ सीरिज इतकाच लोकांना तो आवडेल, अशी अपेक्षा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.
या चित्रपटासाठी कास्ट अद्याप फायनल झालेली नाही. मात्र सूत्रांच्या मते, हृतिक रोशन, प्रियांका चोप्रा, जॅकी चॅन यासारख्या कलाकारांचे नाव यासाठी चर्चेत आहे. हा चित्रपट तीन भागांत शिवाय हिंदी, इंग्लिश व तेलगू अशा तीन भाषांमध्ये बनवला जाईल, असेही कळतेय. हरिनाथ सिंह यांच्या मते, ऐतिहासिक चित्रपट पाहणे लोकांना आवडू लागले आहे. ‘बाहुबली’ने ते सिद्ध केले आहे.
चंगीझ खान किंवा चंगेज खान किंवा (पारसी दस्तऐवजांप्रमाणे) गेंगीझ खान हा बाराव्या शतकातील मंगोल सम्राट होता. त्याने मंगोलियातील सर्व टोळ्यांना एकत्र करून मंगोल साम्राज्याची स्थापना केली. त्याचे मूळ नाव तेमुजीन बोर्जिगीन होते. पाश्चात्य इतिहासकारांनी चंगेज खानाचे वर्णन रक्तपिपासू, क्रूरकर्मा जगज्जेता असे केले असले तरी मंगोलियात त्याला राष्ट्रपित्याचा दर्जा आहे. जगातल्या सर्वांत शक्तिशाली व यशस्वी शासकांमध्ये चंंगेज खानाची गणना होते. भारतातील मुघल हे चंगेज खानाचे वंशज असल्याचा दावा केला जातो. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर हा तैमूर घराण्यातील होता. बाबरच्या मातृवंशाचा संबंध चंगेज खानपर्यंत पोहचतो, असे आजच्या अनेक अधिकृत दस्तऐवजात सांगितले आहे.