अखेर श्रद्धा बोलली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 17:53 IST2016-05-30T12:23:51+5:302016-05-30T17:53:51+5:30
गेल्या तीन वर्षांत श्रद्धा कपूरने पाच सुपरहिट चित्रपट दिलेत. साहजिकच आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाऊ लागले. आता ग्लॅमर, ...

अखेर श्रद्धा बोलली!
ग ल्या तीन वर्षांत श्रद्धा कपूरने पाच सुपरहिट चित्रपट दिलेत. साहजिकच आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाऊ लागले. आता ग्लॅमर, प्रसिद्धी आणि यश हे आल्यानंतर श्रद्धाच्या पर्सनल लाईफबद्दलचे गॉसिपिंगही आलेच. प्रारंभी ‘आशिकी२’चा श्रद्धाचा को-स्टार आदित्य राय कपूर याच्यासोबत तिचे नाव जोडले गेले. यानंतर अलीकडे श्रद्धा व फरहान अख्तर यांच्यात काहीतरी सुरु असल्याच्या बातम्या आल्या. आदित्य व फरहान या दोघांसोबतही श्रद्धाचे नाव जोडण्यात गेले. पण श्रद्धा मात्र मूग गिळून गप्प बसली. आता श्रद्धा चुप्पी तोडायला तयार नाही, म्हटल्यावर तिच्या मनात नेमके आहे तरी काय (??) हे कळायला मार्ग नव्हता. पण आता अखेर श्रद्धाने आपली चुप्पी तोडलीयं. होय!! मी कुणाच्याही पे्रमात नाही, असे श्रद्धाने स्पष्ट केलेय. आदित्य व मी आम्ही कपल नव्हतोच. आमचे नाव कसे जोडले गेले, मला ठाऊक नाही, असे श्रद्धा म्हणाली. फरहानबद्दल विचारल्यावर तर श्रद्धाने मीडियावर अक्षरश: भडासच काढली. अनेकदा मीडितात काहीही छापून येते. पण माझ्या मते, प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. किती लिहावे आणि काय लिहावे, याचे भान असायला हवे. ज्यांच्याबद्दल लिहितो त्यांच्या भावनांचा विचार केला जावा, असे श्रद्धा म्हणाली..वेल श्रद्धा...तू म्हणतेस, ते बरोबर आहे..आताश: तू खुलासा केला म्हटल्यावर काय बोलणार??