अखेर! वाघा बॉर्डरवर ऐशला शूटींगची परवानगी..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2016 22:30 IST2016-02-28T05:30:49+5:302016-02-27T22:30:49+5:30

 वाघा बॉर्डरवर शूटिंग करणे हे वाटते तेवढे सोपे काम नाही. ऐश्वर्या रॉय बच्चन, रणदीप हुडा आणि रिचा चढ्ढा यांच्यापेक्षा ...

After all! Ashley Shouting permission on Wagha Border | अखेर! वाघा बॉर्डरवर ऐशला शूटींगची परवानगी..

अखेर! वाघा बॉर्डरवर ऐशला शूटींगची परवानगी..

 
ाघा बॉर्डरवर शूटिंग करणे हे वाटते तेवढे सोपे काम नाही. ऐश्वर्या रॉय बच्चन, रणदीप हुडा आणि रिचा चढ्ढा यांच्यापेक्षा जास्त अजून कोणाला हे कळू शकते. काही दिवसांपूर्वी ते ‘सरबजीत’ या बायोपिकसाठी वाघा बॉर्डरवर शूटींग करण्यासाठी तयार होते, पण चित्रपटाच्या निर्मात्यांना परवानगी मिळालेली नव्हती. 

richa
अशाप्रकारे, ‘सरबजीत’ चित्रपटाची संपूर्ण टीम आता सुटकेचा निश्वास सोडू शकेल. कारण आता निर्मात्यांना वाघा बॉर्डरवर चित्रपटाची शूटिंग करण्याची परवानगी मिळाली आहे. येथे चित्रपटातील अत्यंत कठीण सीन्स शूट करण्यात येणार आहेत. रणदीपने सरबजीतची भूमिका केली आहे तर ऐशने त्याची बहीण दलबीर कौर हिची भूमिका केली आहे. 

sarabjit
​सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाघा बॉर्डरवर शूटींग करणे हे अत्यंत कठीण काम असते. आता सरबजीतची संपूर्ण टीम खुप खुश आहे. वाघा बॉर्डरनंतर दिल्लीत काही सीन्स शूट केल्यानंतर मुंबईला उरलेल्या भागांवर प्रकाश टाकून सीन्स पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती सुत्रांकडून कळाली.

Web Title: After all! Ashley Shouting permission on Wagha Border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.