अजय-अतुल नंतर लहू-माधव जोडी 'हिट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 06:25 IST2016-01-16T01:07:00+5:302016-02-06T06:25:51+5:30

शंकर जयकिशन, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, नदीम-श्रवण, जतिन-ललित, साजिद-वाजिद यांसारख्या संगीतकारांच्या जोडी हिंदीमध्ये गाजल्या. त्याच्याच पावलावर पाऊल टाकत अनिल-अरुण, अजय-अरुण या ...

After Ajay-Atul, Lahu-Madhav added 'hit' | अजय-अतुल नंतर लहू-माधव जोडी 'हिट'

अजय-अतुल नंतर लहू-माधव जोडी 'हिट'

कर जयकिशन, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, नदीम-श्रवण, जतिन-ललित, साजिद-वाजिद यांसारख्या संगीतकारांच्या जोडी हिंदीमध्ये गाजल्या. त्याच्याच पावलावर पाऊल टाकत अनिल-अरुण, अजय-अरुण या जोड्या मराठीमध्ये देखील हिट ठरल्या.
या यादीमध्ये आता लहू-माधव यांचेही नाव जोडले गेले आहे. लहू पांचाळ आणि माधव आजगावकर या द्वयीने आपल्या संगीताच्या माध्यमातून मराठीच नव्हे तर हिंदीमध्येही स्वत:चा वेगळा ठसा उमटविला आहे. गायक आणि वादक असलेल्या या जोडीचे महाविद्यालयीन जीवनानंतर छान ट्युनिंग जमले आणि त्यांनी मेहनतीच्या जोरावर संगीत क्षेत्रावर स्वत:ची पकड निर्माण केली. 'राजधानी एक्सप्रेस'च्या माध्यमातून त्यांना पहिल्यांदा हिंदीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर 'ध्यास', 'याला जीवन ऐसे नाव' या मराठी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले. लवकरच मिलिंद गवळी दिग्दर्शित 'अथांग' हा त्यांचा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये माधव यांचा विशेष हातखंडा असून, जवळपास २५ हून अधिक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. यासाठी 'माधव-विजय' या नावाने ते परिचित आहेत. यामध्ये 'निर्माल्य', 'लग्न पहावे करून', ' लोणावळा बायपास', अंतर्वेध', 'बावरे प्रेम हे' या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांच्या 'इनव्हेस्टमेंट'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून 'जन गण मन', 'शुगर सॉल्ट आणि प्रेम' या चित्रपटांनीही पुरस्कारांवर नाव कोरले आहे. लाईव्ह म्युझिकच्या ताकदीवर आमचा विश्‍वास असून, विविध वाद्यांच्या वापरावर आमचा भर असतो, असे ते सांगतात. यामुळेच त्यांच्या संगीताचा श्‍वास आणि आवाज हृदयाला भिडतो, अशी भावना संगीतप्रेमी व्यक्त करतात.

Web Title: After Ajay-Atul, Lahu-Madhav added 'hit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.