अहाना कुमरा जवळ जवळ झाली होती बाद! नशिबाने मिळाला ‘Lipstick under my burkha’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2017 14:36 IST2017-07-04T09:03:45+5:302017-07-04T14:36:59+5:30
सेन्सॉर बोर्डासोबतच्या दीर्घ लढाईनंतर दिग्दर्शक -निर्माता प्रकाश झा यांची निर्मिती असलेला ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा सिनेमा या महिन्याच्या ...

अहाना कुमरा जवळ जवळ झाली होती बाद! नशिबाने मिळाला ‘Lipstick under my burkha’!!
स न्सॉर बोर्डासोबतच्या दीर्घ लढाईनंतर दिग्दर्शक -निर्माता प्रकाश झा यांची निर्मिती असलेला ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा सिनेमा या महिन्याच्या अखेरिस रिलीज होतो आहे. सेन्सॉर बोर्डासोबत सुमारे सहा महिने लढा दिल्यानंतर अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. खुलेपणाने आयुष्य जगू पाहणाºया चार महिलांची कथा या चित्रपटात आहे. कोंकणा सेनी, रत्ना पाठक शहा, अहाना कुमरा आणि पब्लिता बोरठाकूर या चौघी यात मुख्य भूमिकेत आहेत.
![]()
ALSO READ : अखेर रिलीज झाला ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’चा दमदार ट्रेलर!!
यापैकी अहाना कुमरा हिच्याबद्दल सांगायचे तर या चित्रपटात काम करण्याची संधी ती जवळजवळ घालवून बसली होती. पण नशिबाने साथ दिली आणि हा चित्रपट अहानाच्या वाट्याला आला. नशिबाची साथ यासाठी कारण, हा चित्रपट मिळण्याबद्दल अहाना स्वत:ला नशिबवाण मानते. या चित्रपटाची आॅफर आली तेव्हा अहाना एका टीव्ही शृंखलेत बिझी होती. तारखांचा मेळ जमत नसल्याने अहानाला मनात असतानाही या चित्रपटाला नकार द्यावा लागला होता. पण अचानक ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ची शूटींग लांबली आणि हा चित्रपट अहानाला मिळाला. शूटींग लांबल्यावर यातील भूमिकेसाठी पुन्हा एकदा अहानाला विचारणा झाली. यावेळी अहानाकडे नकार देण्याचे काही कारणच नव्हते. कारण तिच्याकडे तारखा होत्या. अर्थात चित्रपट मिळवणे तरिही इतके सोपे नव्हते. कारण यासाठी तिला आॅडिशन द्यावे लागणार होते. अहानाने तेही केले. रितसर या चित्रपटासाठी आॅडिशन दिले. ती या आॅडिशनमध्ये पास झाली आणि अहानाची चित्रपटात वर्णी लागली. हा चित्रपट माझ्या वाट्याला यावा हे माझे सौभाग्य आहे, असे अहाना मानते. त्यामुळेच आता अहानाचा पडद्यावरचा अभिनय आपण पाहायलाच हवा.