'विक्रम वेधा'ला लागलं ग्रहण, आमिर खाननंतर ह्रतिक रोशनदेखील 'विक्रम वेधा'चा रिमेक सोडण्याच्या तयारीत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 16:44 IST2021-05-05T16:40:13+5:302021-05-05T16:44:32+5:30
बऱ्याच दिवसांपासून दक्षिणेचा सुपरहिट सिनेमा 'विक्रम वेधा' (Vikram Vedha Hindi Remake) चा हिंदी रिमेक चर्चेत आहे.

'विक्रम वेधा'ला लागलं ग्रहण, आमिर खाननंतर ह्रतिक रोशनदेखील 'विक्रम वेधा'चा रिमेक सोडण्याच्या तयारीत?
बऱ्याच दिवसांपासून दक्षिणेचा सुपरहिट सिनेमा 'विक्रम वेधा' (Vikram Vedha Hindi Remake) चा हिंदी रिमेक चर्चेत आहे. यापूर्वी आमिर खान ( Aamir Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात होते. आमिर खानच्या नावाची जेव्हा निर्माता घोषणा करणार होते तेव्हा त्याने चित्रपटास नकार दिला, त्यानंतर त्या भूमिकेसाठी हृतिक रोशनची निवड करण्यात आली.आता बातमी येत आहे की हृतिक रोशन (Hrithik Roshan) देखील हा सिनेमा सोडण्याच्या विचारत आहे.
'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, जोपर्ययंत हृतिक रोशन या सिनेमाचे शूटिंग सुरू करत नाही तोपर्यंत काहीही सांगणे कठीण आहे. यापूर्वी हृतिकने आरामात हा सिनेमा करण्यास तयार होता, परंतु जेव्हा सर्व काही निश्चित झाले, तेव्हा लॉकडाउन झाले. आता असे दिसते की हृतिकने आपले मन बदलले आहे आणि आता तो कदाचित या सिनेमात दिसू शकतो.
असे म्हटले जात आहे की हृतिकला वेब सीरिजची ऑफरही मिळाली आहे. जी 'द नाईट मॅनेजर' ची हिंदी रिमेक असेल. या वर्षाच्या अखेरीस हृतिक त्याच्या आगामी ‘फाइटर’ सिनेमाच्या शूटिंगलाही सुरुवात करेल. त्यानंतर त्याला 'क्रिश 4' या होम प्रोडक्शन चित्रपटसाठी डेट्स ठेवायला लागू शकतात. अशा परिस्थितीत हृतिकला 'विक्रम वेध' आणि या वेब सिरीजपैकी कोणत्या तरी एकाच प्रोजेक्टमध्ये काम करु शकतो. तरीही आताच यावर काही बोलता येणार नाही.
तमिळ फिल्म ‘विक्रम वेधा’ चित्रपटाला गायत्री पुष्कर दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आर.माधवन दिसला होता.त्याने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका बजावली होती. तर खलनायकाची भूमिका विजय सेतुपाठी यांनी केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता.