तब्बल 5 वर्षानंतर पडद्यावर दिसणार सलमान खान आणि कॅटरिना कैफची केमिस्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 10:44 IST2017-12-22T05:14:37+5:302017-12-22T10:44:37+5:30
सलमान खान आणि कॅटरिना कैफचे फॅन्स टायगर जिंदा है या चित्रपटाची मोठ्या आतुरतेने वाट बघतायेत. तब्बल पाच वर्षांनतंर सलमान ...
.jpg)
तब्बल 5 वर्षानंतर पडद्यावर दिसणार सलमान खान आणि कॅटरिना कैफची केमिस्ट्री
स मान खान आणि कॅटरिना कैफचे फॅन्स टायगर जिंदा है या चित्रपटाची मोठ्या आतुरतेने वाट बघतायेत. तब्बल पाच वर्षांनतंर सलमान आणि कॅट एकत्र स्क्रिन शेअर करतायेत. एक था टायगरमध्ये दोघांना ऑनस्क्रिन एकत्र पाहण्यात आले होते. त्यानंतर अली अब्बास जफर दिग्दर्शित टायगर जिंदा हैमध्ये दोघे दिसणार आहेत. ब्रेकअप झाल्यानंतर त्यांचा हा पहिला चित्रपट आहे. ब्रेकअपनंतरची ऑनस्क्रिन केमिस्ट्री बघण्यासाठी त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत. टायगर जिंदा हैच्या शूटिंग दरम्यान सलमान आणि कॅटरिना पुन्हा एकदा एकमेंकाच्या जवळ आल्याची चर्चा होती. याच कारणामुळे युलियाने टायगर जिंदा हैच्या शूटिंग दरम्यान आबु धाबीला येण्यासाठी हट्ट केला होता. मात्र सलमान तसे होऊन दिले नाही. कॅटरिना सलमानच्या आयुष्यात परतल्यामुळे सलमान आणि युलिया वंतूर यांच्यात दुरावा आल्याची ही चर्चा होती.
![]()
टायगर जिंदा है’ हा चित्रपट सलमान खानच्या २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’ चित्रपटाचा दुसरा भाग आहे. या भागात ‘एक था टायगर’ची पुढची स्टोरी दाखविण्यात येणार आहे. या भागातही सलमान आणि कॅटरिना जासूसची भूमिका साकारताना दिसणार आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती यशराज बॅनरअंतर्गत केली जात आहे. दिवाळीच्या मुहूर्ताला भाईजानने ‘टायगर जिंदा है’चे पहिले पोस्टर आऊट केले होते.
![]()
दिवाळीच्या एक दिवसआधी भाईजानने आपल्या tweeter अकाऊंटवर हे पोस्टर जारी करत जोरदार धमाका केला होता. दिग्दर्शक अली अब्बास जफरने एका गोष्टीची पूरेपूर काळजी घेतली आहे. ती म्हणजे, २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’चा फ्लेवर त्याच्या सीक्वलमध्येही जसाच्या तसा प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, याकडे जफरने लक्ष दिले आहे. सलमान आणि कॅटरिनाचे सेटवरचे लीक झालेल्या फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री बघायला मिळाली होती. कॅटरिनासाठी सलमान खान लकी चार्म ठरला आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. कारण टायगर जिंदा है चित्रपट साईन करताच आणखीन दोन मोठे चित्रपट तिच्या हाती लागले आहेत.