सलमान खान पहिल्यांदाच दिसणार बायोपिकमध्ये, साकारणार या व्यक्तीची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 16:25 IST2021-06-18T16:20:58+5:302021-06-18T16:25:27+5:30
सलमान खानने आजपर्यंत कधीच कोणत्या बायोपिकमध्ये काम केले नाही.

सलमान खान पहिल्यांदाच दिसणार बायोपिकमध्ये, साकारणार या व्यक्तीची भूमिका
सलमान खानने त्याच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. पण त्याने आजपर्यंत कधीच कोणत्या बायोपिकमध्ये काम केले नाही. पण सलमान पहिल्यांदाच एका बायोपिकमध्ये काम करणार असून हा चित्रपट एका प्रसिद्ध गुप्तहेराच्या आयुष्यावर आधारित आहे.
प्रसिद्ध भारतीय गुप्तहेर रवींद्र कौशिक यांच्या आयुष्यावर दिग्दर्शक राजकुमार गुप्ता चित्रपट बनवत असून ब्लॅक टायगर असे या चित्रपटाचे नाव आहे. रवींद्र कौशिक यांना आजवरचा सर्वात चांगला गुप्तहेर मानले जाते. त्यांना ब्लॅक टायगर म्हणून ओळखले जाते. त्याचमुळे या चित्रपटाचे नाव ब्लॅक टायगर ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाची पटकथा सलमानला ऐकवण्यात आली असून त्याला ती आवडली असल्याचे म्हटले जात आहे. तो या चित्रपटात रवींद्र कौशिक यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर राधे-द मोस्ट वाँटेड भाई हा त्याचा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. यामध्ये सलमान खानसह जॅकी श्रॉफ, दिशा पटानी, रणदीप हुडा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या.