रणबीर-आलियासोबत राशिद खानने काढला फोटो, बॉलिवूड कलाकारांना भेटून क्रिकेटपटू खूश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 10:37 AM2023-09-15T10:37:30+5:302023-09-15T10:38:48+5:30

राशिद खान अन् रणबीर आलियाची न्यूयॉर्कमध्ये झाली भेट

Afghanistan cricketer rashid khan met ranbir kapoor and alia bhat in new york clicks photo | रणबीर-आलियासोबत राशिद खानने काढला फोटो, बॉलिवूड कलाकारांना भेटून क्रिकेटपटू खूश

रणबीर-आलियासोबत राशिद खानने काढला फोटो, बॉलिवूड कलाकारांना भेटून क्रिकेटपटू खूश

googlenewsNext

बॉलिवूडचं लोकप्रिय कपल रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आणि आलिया भट (Alia Bhat)सध्या न्यूयॉर्कमध्ये आहेत. अमेरिकेत सुट्टी एन्जॉय करतानाचे त्यांचे अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मध्यंतरी करिष्मा कपूरही न्यूयॉर्कला गेली असता तिथे तिने रणबीर आलियासोबत मजा केली. रणबीर आलिया या पॉवर कपलसोबत अनेक चाहतेही फोटो काढत असतात. पण एका फोटोने सर्वांचंच लक्ष वेधलंय. कारण या फोटोत बॉलिवूड आणि क्रिकेट एकत्र आलंय. क्रिकेटमध्येही भारतीय क्रिकेटर नाही तर अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खानने Rashid Khan) रणबीर-आलियासोबत फोटो पोस्ट केला आहे.

काय म्हणाला राशिद खान?

क्रिकेटपटू राशिद खानने रणबीर आणि आलियासह फोटो पोस्ट करत लिहिले, 'बॉलिवूडचे दोन मोठे कलाकार, रणबीर-आलिया तुम्हाला भेटून आनंद झाला.' फोटोत तिघेही कॅज्युअल लुकमध्ये दिसत आहेत. आलिया नेहमीप्रमाणेच तिच्या नो मेकअप लुकमध्ये क्युट अंदाजात दिसत आहे. तर राशिद खानला भेटून रणबीर कपूरच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसून येतोय. राशिद खानने दोघांच्या मध्ये उभं राहत फोटो क्लिक केलाय.

अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू राशिद खान वर्ल्ड कपसाठी तयार होत आहे. भारतात ५ ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कप सुरु होणार आहे. यासाठी अफगाणिस्तानची टीम तयार झाली आहे. हशमतुल्लाह शाहिदीच्या नेतृत्वाखाली अफगाणची चीम सज्ज झाली आहे. राशिद खानचीही टीममध्ये निवड झाली आहे.

Web Title: Afghanistan cricketer rashid khan met ranbir kapoor and alia bhat in new york clicks photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.