नवाजुद्दीन सिद्दीकीने निहारिका सिंगबाबत केलेल्या वक्तव्यावर वकिलाने केली तक्रार दाखल करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 16:09 IST2017-10-30T10:39:23+5:302017-10-30T16:09:23+5:30
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याचे चरित्रात्मक पुस्तक ‘अॅन ऑर्डिनरी लाईफ’मुळे चर्चेत आहे. या पुस्तकात असलेल्या त्याच्या अफेअरमुळे तो ...

नवाजुद्दीन सिद्दीकीने निहारिका सिंगबाबत केलेल्या वक्तव्यावर वकिलाने केली तक्रार दाखल करण्याची मागणी
>बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याचे चरित्रात्मक पुस्तक ‘अॅन ऑर्डिनरी लाईफ’मुळे चर्चेत आहे. या पुस्तकात असलेल्या त्याच्या अफेअरमुळे तो चर्चेत आला. आपल्या मिस लवली चित्रपटातील को-स्टार निहारिका सिंग आणि सुनीता राजवरसोबत असलेल्या रिलेशनशीपला घेऊन अनेक खुलासे केले. या कारणामुळे दिल्लीच्या एका वकिलाने नवाजुद्दीन विरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
गौतम गुलाटी या वकिलाने नवाजविरोधात तक्रार दाखल केली आहे. मिड डेच्या रिपोर्टनुसार महिला आयोगाकडे कलम 376, 497 आणि 509 अंतर्गत तक्रार दाखल करुन घेण्याची विनंती केली आहे. गौमत गुलाटीने सांगितले की नाही तो निहारिकाला ओळख यासंदर्भात त्याचे तिच्याशी काही बोलणं देखील झालेले नाही. गौतमचे म्हणणे आहे कि नवाजने स्वत: च्या पब्लिसिटीसाठी महिलांच्या सन्मानाचा गैरवापर केला आहे.
नवाजने आपल्या पुस्कात अभिनेत्री निहारिका सिंह हिच्या सोबतच्या नात्यासंबंधी खळबळजनक खुलासा केला होता. नाहारिका ही एक हुशार मुलगी आहे. ती माझ्या आयुष्यात आलेली पहिली मुलगी. तिला माझ्याकडून प्रेम हवे होते. पण मी एक स्वार्थी पुरुष होतो. माझा उद्देश स्पष्ट होता. तिच्या घरी जायचे. शरीरसुख घ्यायचे आणि नंतर तेथून निघायचे. मी कधीच तिच्याशी प्रियकरासारखे बोललो नाही. अखेर एके दिवशी तिला कळले की, मी केवळ स्वत:चा विचार करणारा पुरुष आहे आणि तिने मला सोडले.मी रडलो. गयावया केली. माफी मागितली. पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती, ’असे नवाजने यात म्हटले आहे.
ALSO : नवाजुद्दीन सिद्दिकीच्या ‘या’ पहिल्या प्रेयसीने म्हटले, ‘मला तुझी किळस वाटायची’!
ALSO : नवाजुद्दीन सिद्दिकीच्या ‘या’ पहिल्या प्रेयसीने म्हटले, ‘मला तुझी किळस वाटायची’!
हा पुस्तकाच्या प्रकाशनानंतर निहारिकाने नवाजचे या सगळे दावे फेटाळले होते. आईएएनएसच्या नुसार निहारिकाने सांगितले ‘मिस लव्हली या चित्रपटादरम्यान मी व नवाज अगदी थोड्या काळासाठी रिलेशनशिपमध्ये होतो. २००९ मध्ये अगदी काही महिने ही रिलेशनशिप टिकली. आज नवाजने मला फरचा कोट घातलेली आणि नवाजला बेडरूमपर्यंत घेऊन गेलेली महिला म्हणून सादर केलेय. यावर मी केवळ हसू शकते.