आंखों की गुस्ताखियां माफ हो! पुन्हा एकत्र दिसले लव्हबर्ड अनन्या पांडे- आदित्य रॉय कपूर, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 12:53 PM2023-07-18T12:53:48+5:302023-07-18T12:56:05+5:30

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे व्हॅकेशनवर गेले आहेत. त्यांच्या व्हॅकेशन फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

Aditya roy kapur and ananya panday are lost in conversation at a restaurant view pic | आंखों की गुस्ताखियां माफ हो! पुन्हा एकत्र दिसले लव्हबर्ड अनन्या पांडे- आदित्य रॉय कपूर, फोटो व्हायरल

आंखों की गुस्ताखियां माफ हो! पुन्हा एकत्र दिसले लव्हबर्ड अनन्या पांडे- आदित्य रॉय कपूर, फोटो व्हायरल

googlenewsNext

बॉलिवूड स्टार आदित्य रॉय कपूर सध्या अभिनेत्री अनन्या पांडेसोबत पोर्तुगालमध्ये क्वालिटी टाईमस्पेंट करते आहे. 
 मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदित्य रॉय आणि अनन्या पांडे एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, आतापर्यंत दोघांनीही या प्रकरणावर मौन सोडलेले नाही. आदित्य आणि अनन्या अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. अलीकडेच आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे व्हॅकेशनवर गेले आहेत. त्यांच्या व्हॅकेशन फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, आदित्य आणि अनन्याचा एक फोटो समोर आला आहे, ज्याला पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.


अलीकडेच आदित्य रॉय आणि अनन्या पांडेचे अनेक फोटो समोर आले होते, ज्यामध्ये आदित्य अनन्याला मिठी मारताना दिसत होता. हे फोटो पाहिल्यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, अनन्या पांडे आणि आदित्यच्या आणखी एका फोटो इंटरनेटवर चर्चेत आला आहे. या फोटोमध्ये आदित्य रॉय आणि अनन्या पांडे  एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले दिसत आहेत. फोटोमध्ये, अनन्या व्हाईट टी-शर्टवर स्वेटर घातलेले दिसतेय तर आदित्य देखील कॅज्युअल शर्टमध्ये हँडसम दिसतोय. 

कॉफी विथ करणपासून अफेअरची सुरू झाली चर्चा 
आदित्य आणि अनन्याच्या नात्याची चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा अनन्या गेल्या वर्षी कॉफी विथ करणमध्ये दिसली. शोमध्ये करण जोहरने आदित्य आणि अनन्या एकत्र असल्याची हिंट दिली होती. मात्र, याबाबत कोणीही सविस्तर चर्चा केली नव्हती.

अनेक ठिकाणी झाले एकत्र स्पॉट्स
गेल्या वर्षभरापासून दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत आहेत. गेल्या वर्षी क्रिती सनॉनच्या दिवाळी पार्टीत दोघेही एकत्र दिसले होते. यानंतर दोघांनी लॅक्मे फॅशन वीकमध्ये मनीष मल्होत्रासाठी रॅम्प वॉकही केला. यानंतर २०२२ मध्ये दोहा येथे झालेल्या फिफा वर्ल्ड कपमध्येही ते एकत्र दिसले होते. आदित्य रॉय कपूरपूर्वी अनन्या पांडेचे नाव अनेक स्टार्ससोबत जोडले गेले आहे. या यादीत कार्तिक आर्यनच्या नावाचाही समावेश आहे.


 

Web Title: Aditya roy kapur and ananya panday are lost in conversation at a restaurant view pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.