​आदित्य पांचोली सांगतोय कंगना राणौत मला पत्नीसारखीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 12:05 IST2017-09-07T06:35:45+5:302017-09-07T12:05:45+5:30

आदित्य पांचोली आणि कंगना राणौत हे अनेक वर्षं नात्यात होते. कंगनाने देखील आदित्य पांचोलीविषयी अनेक गोष्टी आप की अदालत ...

Aditya Pancholi is telling me that Kangana Ranaut is like a wife | ​आदित्य पांचोली सांगतोय कंगना राणौत मला पत्नीसारखीच

​आदित्य पांचोली सांगतोय कंगना राणौत मला पत्नीसारखीच

ित्य पांचोली आणि कंगना राणौत हे अनेक वर्षं नात्यात होते. कंगनाने देखील आदित्य पांचोलीविषयी अनेक गोष्टी आप की अदालत या कार्यक्रमात सांगितल्या आहेत. कंगनाच्या या मुलाखतीनंतर सगळीकडेच याची चांगलीच चर्चा रंगली. कंगनाने या मुलाखतीत आदित्यवर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे ही मुलाखत ऐकल्यावर आदित्यला प्रचंड राग आला असून कंगना ही वेडी असल्याचे त्याने म्हटले आहे. एवढेच नव्हे तर त्याने या विरोधात न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे देखील मीडियाला सांगितले आहे. 
आदित्य आणि कंगना हे प्रकरण आज नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे. आदित्यने कंगनावर हात उचचला असल्याची तक्रारदेखील तिने पोलिसांकडे दाखल केली होती. त्याच दरम्यान २००८ ला आदित्यने मुंबई मिरर या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत कंगणा आणि मी अनेक वर्षं पती-पत्नीसारखेच राहात असल्याचे म्हटले होते. त्याने मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही दोघे हे एखाद्या पती-पत्नीसारखेच होतो. अंधेरीतील यारी रोड येथे आमच्या दोघांसाठी मी घर देखील घेत होतो. आम्ही तीन वर्षं एक मित्राच्या घरात एकत्र राहात होतो. मी तिला भेटलो तेव्हा तिच्याकडे एक रुपयादेखील नव्हता. २७ जून २००४ला मी तिला सगळ्या पहिल्यांदा भेटलो. त्यावेळी ती आशा चंद्रा अॅक्टिंग स्कूलमधील तिच्या एका मित्रासोबत बाईकवर बसली होती. ती खूपच तणावात दिसत होती. मला पाहाताच ती आली आणि तिने मला हाय म्हटले आणि माझे नाव कंगना असे तिने मला सांगितले. ती मुंबईत आल्यावर आमच्या एका कॉमन मित्राने मला तिला मदत करायला सांगितले होते. त्यामुळे तिच्याशी मी एकदम व्यवस्थित बोललो. त्यानंतर तिने मला सतत फोन करायला सुरुवात केली. सुरुवातीला ती एका छोट्याशा गावातील अतिशय साधी मुलगी होती. मी हळूहळू करून तिच्या प्रेमात पडलो. आम्ही दोघे एकत्र राहायला लागलो. ती जो फोन वापरत होती, तो फोनदेखील माझाच होता. एका दिवशी तिने मला सांगितले की, एक मुलगा तिला फोन करून खूप सतवतो आहे. पण तिच्या मोबाईचे बिल पाहिल्यानंतर कंगनाच त्याला अनेक वेळा फोन करत असल्याचे मला कळले. तिला त्रास देत असलेल्या मुलाशी ती एवढ्या वेळ का बोलतेय हे मला तेव्हा कळलेच नव्हते. खरे तर मला तेव्हाच कळायला पाहिजे होते की ती मला फसवत आहे. तसेच तिने माझ्या नावाचा वापर करून तिच्या एका मानलेल्या भावाला दुबईमध्ये नोकरी मिळवून दिली. मला त्याची कल्पना देखील नव्हती. शाकालाका बूमबूम या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी ती दक्षिण आफ्रिकेला गेली असता एका अभिनेत्याच्या खूप जवळ गेली होती. ती त्याला अनेक मेसेजेस देखील पाठवत असे. ते मेसेजेस मी वाचले होते. त्यानंतर आमच्याच खूप भांडणं झाली होती. त्यावेळी मी सगळ्यात पहिल्यांदा तिच्यावर हात उचलला. पण त्यावेळी आम्ही दोघांनी सगळे काही विसरून आयुष्यात पुढे जायचे ठरवले. ज्यावेळी कंगनाची बहीण रंगोलीवर अॅसिड हल्ला झाला, त्यावेळी देखील मी तिला सगळी काही मदत केली होती. पण माझे उपकार मानण्याचे सोडून कंगना मला शिव्या घालू लागली. माझी तुलना तिने अॅसिड हल्लेखोरासोबत केली होती. त्यामुळे मला खूप राग आला होता. मी रागातच तिच्या घरी गेलो होतो. पण मला पाहाताच ती रिक्षातून पळ काढायला लागली. मी तिला थांबवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण ती निघून गेली. मी पाण्यासारखा पैसा तिच्यावर ओतला. मी तिच्या बहिणाच्या प्लास्टिक सर्जरीसाठी दहा लाख रुपये दिले. तसेच तिचे हॉस्पिटलचे बिल मी दिले. मुकेश भट्टने कंगनाला एका चित्रपटासाठी साईन केले होते. पण तिने नकार दिल्यानंतर साईनिंग अमाऊंटचे ५० हजार देखील मी परत केले. कंगनाने मला पैशांसाठी वापरले. 

Also Read : ​कंगना राणौतच्या आप की अदालतमधील मुलाखतीनंतर नेटिझन कंगनाला का मागायला सांगत आहेत क्रिश ३ साठी माफी?

Web Title: Aditya Pancholi is telling me that Kangana Ranaut is like a wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.