आदित्य कपूर - अनन्या पांडेचं झालं ब्रेकअप? अनन्याच्या 'त्या' पोस्टने चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 12:42 PM2024-04-09T12:42:27+5:302024-04-09T12:43:52+5:30

अनन्या पांडे आणि आदित्या रॉय कपूर यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. अनन्याने लिहिलेल्या पोस्टमुळे चाहत्यांना काळजी लागून राहिली आहे.

Aditya Kapoor - Ananya Pandey Breakup ananya pandey cryptic post viral | आदित्य कपूर - अनन्या पांडेचं झालं ब्रेकअप? अनन्याच्या 'त्या' पोस्टने चर्चांना उधाण

आदित्य कपूर - अनन्या पांडेचं झालं ब्रेकअप? अनन्याच्या 'त्या' पोस्टने चर्चांना उधाण

आदित्य कपूर - अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी. आदित्य - अनन्या हे दोघे गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहेत. आदित्य - अनन्या अनेक पार्टी - इव्हेंटमध्ये एकत्र दिसतात. इतकंच नव्हे तर त्यांचे रोमँटिक फोटोही चाहत्यांच्या पसंतीस उतरतात.  अशातच गेल्या काही दिवसांपासून आदित्य - अनन्याच्या ब्रेकअपच्या चर्चा आहेत. त्यातच अनन्याने लिहिलेल्या एका पोस्टमुळे त्यांचं खरंच ब्रेकअप झालंय का याबद्दल चाहते संभ्रमात आहेत. 

झालं असं की, "जे खरोखर तुमच्यासाठी आहे, ते तुमच्यासाठी परत येईल. ते साथ सोडेल तुम्हाला धडे शिकवण्यासाठी जे फक्त तुम्ही स्वतःहूनच शिकू शकता. ते जर खरोखर तुमच्यासाठी असेल तर ते परत येईल जरी तुम्ही कितीही त्यास नकार दिला तरीही. इतके सुंदर काही आपले असू शकत नाही असे जरी आपण गृहीत धरले तरीही. कारण जे तुमच्यासाठी आहे ते तुमच्यापासून वेगळे कधीच होऊ शकत नाही. ते तुमच्या मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात दडलेले असतेच,” अशी पोस्ट अनन्याने लिहिली आहे.

ही पोस्ट वाचून अनेकांना काळजी वाटली असून अनन्या-आदित्यचं खरंच ब्रेकअप झालंय अशी चर्चा आहे. आता या दोघांचं खरंच ब्रेकअप झालंय का? हे त्या दोघांनाच ठाऊक. "फक्त चांगले मित्र राहू शकत नाही?" असं आदित्या अनन्याबद्दल एका मुलाखतीत म्हणाला होता. त्यामुळे आदित्य - अनन्या या दोघे एकमेकांपासून वेगळे झाले असून त्यांचं ब्रेकअप झाल्याची अटकळ बांधली जात होती. आता अनन्याच्या या पोस्टमुळे आदित्य - अनन्या खरंच एकमेकांपासून वेगळे झालेत असं म्हटलं जात आहे.

Web Title: Aditya Kapoor - Ananya Pandey Breakup ananya pandey cryptic post viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.