आदित्य चोप्रा करतोय टॅलेंट हंट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2016 01:39 IST2016-02-27T08:39:16+5:302016-02-27T01:39:16+5:30

 निर्माता आदित्य चोप्रा हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटासाठी टॅलेंट हंट करत आहे. यशराज फिल्म्सचे बॅनर असे आहे की, त्यामुळे ...

Aditya Chopra doing talent hunt! | आदित्य चोप्रा करतोय टॅलेंट हंट!

आदित्य चोप्रा करतोय टॅलेंट हंट!

 
िर्माता आदित्य चोप्रा हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटासाठी टॅलेंट हंट करत आहे. यशराज फिल्म्सचे बॅनर असे आहे की, त्यामुळे अनेक नव्या जोड्या सर्वांच्या समोर आल्या आहेत. आत्तापर्यंत त्याने अनुष्का शर्मा, रणवीर सिंग, अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांना त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून ‘स्टार’ बनवले आहे. आता तो अशाच एका नव्या जोडीच्या शोधात आहे. 

आदित्य चोप्राने पुन्हा एकदा दिग्दर्शक हबीब फैजलसोबत टीम बनवली आहे. आदित्यच्या बॅनरखाली तो प्रथमच चित्रपट साकारतो आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, आदित्यला काही कलाकारांमध्येच चित्रपटाचे टॅलेंट दिसते.

हा चित्रपट म्हणजे नवोदितांसाठी एक गोल्डन चान्स असणार आहे. चित्रपटाची स्टोरी निश्चित झाली असून स्क्रिप्टवर काम सुरू आहे. सध्या दोन नवे चेहरे चित्रपटासाठी साईन केले आहेत. पण तरीही आदित्य नव्या दोन चेहºयांच्या शोधात आहेच. 

Web Title: Aditya Chopra doing talent hunt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.