अदा शर्मा का कंटाळली त्याच त्या भूमिकांना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 17:22 IST2017-01-27T11:49:47+5:302017-01-27T17:22:30+5:30

कलाकार जेव्हा सिनेसृष्टीत काम करायला सुरू करतो. तेव्हा त्याची माफक इच्छा असते ती म्हणजे त्याला विविध भूमिकांवर काम करायला ...

Ada Sharma bored the same roles? | अदा शर्मा का कंटाळली त्याच त्या भूमिकांना?

अदा शर्मा का कंटाळली त्याच त्या भूमिकांना?

ाकार जेव्हा सिनेसृष्टीत काम करायला सुरू करतो. तेव्हा त्याची माफक इच्छा असते ती म्हणजे त्याला विविध भूमिकांवर काम करायला मिळाले पाहिजे. त्याच्यातील कलाकारालाही आव्हान वाटावं अशा भूमिका असायला हव्यात. अशीच अपेक्षा दाक्षिणात्य ब्युटी अदा शर्मा हिने देखील व्यक्त केली आहे. अदाला त्याच त्याच भूमिका करण्याचा खुप कंटाळा येतो, हे स्वत: तिनेच सांगितले आहे. 

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारलेली अदा शर्मा ही म्हणते,‘माझा जन्म मुंबईतला. त्यामुळे मला हिंदी, इंग्लिश आणि तमीळ या भाषा उत्तमप्रकारे बोलता येतात. इतर कलाकारांना भाषांचा अडथळा असतो तसा माझ्या बाबतीत नाही. त्यामुळे मला असे वाटते की मला विविध प्रकारचे रोल्स मिळावेत. मला ‘कमांडो२’ ची आॅफर आली तेव्हा मी त्याची काही गंमत केली नाही. उलट मी या भूमिकेला आव्हान म्हणून स्विकारले.’ 

‘कमांडो २’ मध्ये विद्युत जामवाल याच्यासोबत मुख्य भूमिकेत अदा शर्मा दिसणार असून आत्तापर्यंतचा सर्वांत जास्त आव्हानात्मक रोल असल्याचे ती सांगते. तिने दाक्षिणात्य चित्रपटांत साकारलेल्या जास्तीत जास्त भूमिका या भावनाविवश करणाऱ्या  आहेत.

ALSO READ : 
* अदा इशासोबत कमांडो २ मध्ये काम करणार

Web Title: Ada Sharma bored the same roles?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.